Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इंडिया ग्लोबल फोरममध्ये मोठी नियुक्ती, बीबीसीचे वरिष्ठ अधिकारी उदय करण वर्मा यांची IGF मध्ये एंट्री

लंडन: भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर मांडण्यात आणि देशासाठी प्रभावी आंतरराष्ट्रीय भागीदारी विकसित करण्यात आघाडीची भूमिका बजावणाऱ्या इंडिया ग्लोबल फोरम अर्थात आयजीएफमध्ये 'बीबीसी' इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उदय करण वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती करुन या संस्थेने आपल्या पुढच्या प्रवासात एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

उदय करण वर्मा, यांनी अलीकडे 'बीबीसी' इंडियाचे राष्ट्रीय व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. 'बीबीसी' इंडियामध्ये सात वर्षे विविध महत्त्वाच्या भूमिका बजावल्यानंतर आपल्या दीर्घ कार्यकाळात, उदय वर्मा यांनी व्यवसायाच्या संधी विकसित करण्यात आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यात सखोल कौशल्य प्राप्त केले आहे. आता ते इंडिया ग्लोबल फोरमचे अध्यक्ष -बिझनेस रिलेशन्स ) म्हणून काम पाहतील.

Senior BBC official Uday Karan Verma appointed

उदय करण वर्मा यांचा बीबीसी, नेटवर्क-18 आणि ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्स सारख्या शीर्ष ब्रँड्समध्ये कार्याचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. बीबीसीमध्ये त्यांनी बीबीसी स्टोरीवर्क्स लाँच करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि बीबीसी गोल्फ कनेक्ट आणि बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर सारख्या यशस्वी कार्यक्रमांचे नेतृत्व केले आहे. कमाई, सामग्री आणि धोरणात्मक नेतृत्वात त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे.

IGF मधील आपल्या नवीन भूमिकेबद्दल, उदय करण वर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, "आयजीएफमध्ये सहभागी होण्यामुळे मला आनंद झाला आहे. हे व्यासपीठ जागतिक स्तरावर भारताचे मुद्दे अतिशय चांगल्या प्रकारे सादर करते. आयजीएफचे ध्येय, भारताच्या अफाट क्षमतांना उजाळा देणे, माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. खासकरुन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या हे खूप महत्वाचे आहे. या गतीशील टीममध्ये सामील होऊन, मी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आणि जागतिक संभाषणांना आकार देण्यासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे."

इंडिया ग्लोबल फोरम म्हणजे काय?

इंडिया ग्लोबल फोरम ही एक जागतिक संस्था आहे, जी समकालीन भारताची स्टोरी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडते. आयजीएफ मानते की, भारताचा विकास दर आणि बदलाचा वेग जगासाठी अगणिक संधी उपलब्ध करून देतो आणि या संधी निर्माण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

इंडिया ग्लोबल फोरमचे प्रयत्न समृद्धी आणि जागतिक स्थैर्याला चालना देणे, भारताचे तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती इकोसिस्टमला जगाशी जोडणे, शाश्वत भविष्यासाठी हवामान नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, व्यवसाय आणि समाजातील विविधता आणि सर्जनशीलतेद्वारे सशक्तीकरणाला चालना देणे, जेणेकरून भविष्यासाठी प्रेरणा मिळू शकेल आकारही देता येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+