जगात तिसरे महायुद्ध होणार! पुतिन यांनी उघडला तिसरा डोळा; युक्रेनवर केला ICBM हल्ला, थरारक घडलं..!
Russia-Ukraine War : जगभरात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचे कारण देखील भयंकर आहे. कारण रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. या दोन्ही देशातील युद्ध धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे.
युक्रेनने अमेरिकेच्या क्षेपणास्त्राने रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश घडवला आहे. यानंतर पुतिन यांची असे धोकादायक पाऊल उचलले की त्याने संपूर्ण जग हादरले आहे. रशियाने प्रथमच युक्रेनवर ICBM (इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल) हल्ला केला आहे.

लांब पल्ल्याचे ICBM अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. रशियाने ICBM च्या माध्यमातून अण्वस्त्र हल्ला केला आहे की अन्य कोणत्याही प्रकारच्या विध्वंसक शस्त्राचा वापर केला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
रशियावर अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याच्या अमेरिकन क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिली असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ICBMs वापरण्याची परवानगी दिली आहे. युक्रेनमधून रशियाच्या अंतर्गत भागांवर अनेक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत.
अखेर पुतिन यांनी तिसरा डोळा उघडला
अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे संतप्त झाले. अमेरिकेच्या निर्णयानंतर रशियाने आता युक्रेनवर ICBMs सह हल्ला केला आहे, यासंदर्भात युक्रेनकडून दावा करण्यात आला आहे.
युक्रेनने सांगितले की, ICBM हल्ला देशाच्या मध्य-पूर्वेला असलेल्या डनिप्रो शहरात करण्यात आला. रशियाने युक्रेनवर ज्या ICBM ने हल्ला केला आह ते अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची रचना आण्विक वारहेडसाठीही करण्यात आली आहे. मात्र, रशियन ICBM मध्ये कोणत्या प्रकारची शस्त्रे वापरली गेली हे युक्रेनने अद्याप सांगितलेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार हा अण्वस्त्र हल्ला नसल्याचे देखील सांगितले जात आहे.
अमेरिकन क्षेपणास्त्राने विध्वंस
अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे. यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आण्विक हल्ल्याची धमकी दिली. अमेरिकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर युक्रेनकडून रशियावर अनेक हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे रशियातील अनेक भागात विध्वंस झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यानंतर आता राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध ICBMs वापरण्यास हिरवा सिग्नल दिला आहे. जवळपास 1000 दिवसांपासून सुरू असलेल्या युक्रेनसोबतच्या युद्धात पहिल्यांदाच ICBM चा वापर करण्यात आला आहे. दुसरीकडे, रशिया युक्रेनला अँटी पर्सनल लँड माइन्स पुरवणार आहे.
तिसऱ्या महायुद्धाची भीती
रशियाने युक्रेनशी लढण्यासाठी हजारो उत्तर कोरियाचे सैनिक उतरवले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली. यानंतर युक्रेनने अमेरिकन आणि ब्रिटिश क्षेपणास्त्रांच्या मदतीने रशियावर अनेक हल्ले केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्वात जास्त अणुबॉम्ब असलेल्या रशियाने आपल्या अणु तत्त्वांमध्ये बदल केला आहे. रशियाने पहिल्यांदाच युक्रेनमध्ये लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. रशियन हल्ल्याच्या भीतीने अनेक देशांनी युक्रेनमधील आपले दूतावास बंद केले आहेत. बदललेल्या परिस्थितीत तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
रशियाने म्हटले- अमेरिका युक्रेन युद्ध लांबवण्याचा प्रयत्न करतेय
अमेरिकेत ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर बायडेन सरकार युक्रेनला मदत करण्यासंदर्भात नवीन निर्णय घेत आहे. बायडेन यांनी सोमवारी युक्रेनला एटीएसीएमएस क्षेपणास्त्रांसह रशियावर हल्ला करण्यास अधिकृत केले. यानंतर मंगळवारी युक्रेनने रशियावर क्षेपणास्त्रे डागली.
भूसुरुंग देण्यासंदर्भातील बातम्यांबाबत रशियाने सांगितले की, बायडेन प्रशासन युक्रेन युद्ध लांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले- तुम्ही अलीकडे घेतलेल्या काही निर्णयांकडे लक्ष द्या. युद्ध लांबवण्यासाठी त्यांना काहीही करायचे आहे हे स्पष्ट दिसते.
पुतिन यांनी अण्वस्त्रांशी संबंधित नियम बदलले
युक्रेनचा रशियावर हल्ला होण्याच्या काही तास आधी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापरास परवानगी देणारा निर्णय मंजूर केला. नवीन नियमानुसार, ज्या देशाकडे अण्वस्त्रे नाहीत अशा देशाने अणुशक्ती असलेल्या देशाच्या पाठिंब्याने रशियावर हल्ला केला तर तो रशियाविरुद्ध युद्धाची घोषणा मानला जाईल. अशा स्थितीत मॉस्को अण्वस्त्रांचा वापर करू शकतो.












Click it and Unblock the Notifications