रशियाची अणुहल्ल्याची धमकी, महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला धडकी! युक्रेनमधील दुतावास केला बंद
Russia Threatens Nuclear Attack US Closes Its Embassy in Ukraine : रशियाने अणुहल्ल्याची धमकी दिल्यानंतर खुद्द महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेने धास्ती घेतली आहे. अमेरिकेने युक्रेनमधील आपला दुतावास बंद केला आहे. तसेच अमेरिकेच्या नागरिकांनाही दक्षतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेने संभावित हवाई हल्ल्यांची भिती बघता त्यांचा युक्रेनमधील दुतावास तात्पूरत्या स्वरुपात बंद केला आहे. दुतावासातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, दुतावासातील स्टाफला कामकाज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह युक्रेनमध्ये राहणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांनाही अशा हल्ल्यासंदर्भात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

युक्रेनने लक्ष्मणरेषा ओलांडली?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मंगळवारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला अणुहल्ल्याने प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली होती. अशा स्थितीत रशिया आता युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. युक्रेनचे अध्यक्ष झालेस्की यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला करून लक्ष्मणरेषा ओलांडल्याचे जाणकार सांगत आहेत. त्यामुळेच युरोपीय देश अणुयुद्धाच्या धोक्याबाबत सावध होऊ लागले आहेत.
रशियात बंकर बांधण्याचे काम सुरु
नॉर्वे, फिनलंड आणि डेन्मार्कमध्ये लोकांनी अन्न आणि इतर आवश्यक वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी रशियामध्ये एन-प्रतिरोधक मोबाईल बंकर बांधण्याचे कामही सुरू झाले आहे. इंटेल कोअर बिल्ट-इन सस्टेनेबिलिटी बेनिफिट्स इंटेल प्रो सह अलीकडेच, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रशियावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर युक्रेनच्या हल्ल्याला मान्यता दिली. म्हणजेच शुक्रानची सुपरसॉनिक मिसाइल टॅक्टिकल मिसाइल सिस्टीम (ATACMS) रशियाच्या अंतर्गत हल्ल्यांसाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली होती.
जगात वाढला अणुयुद्धाचा धोका
रशियाने मंगळवारी आपल्या आण्विक धोरणात मोठे बदल केले. त्यानंतर रशिया कोणत्याही अण्वस्त्र सज्ज नसलेल्या देशाच्या आक्रमकतेवर गांभीर्याने विचार करणार आहे. एखाद्या अण्वस्त्र सज्ज देशाशी आक्रमक देशाचा समझोता होत असल्यास आणि संबंधित देश रशियावर हल्ला करीत असल्यास आपल्या अण्वस्त्र धोरणावर रशिया पुन्हा विचार करणार आहे. मंगळवारच्या घडामोडीमुळे अणुयुद्धाची शक्यता आणखी वाढली आहे. रशियाच्या नव्या नीतीच्या अनुसार आता जागतिक स्थिती आणखी गंभीर होणार आहे.
मंगळवारी पत्रकारांशी बातचीत करताना रशियाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की रशियाने घेतलेल्या नव्या निर्णयाच्या अनुसार कोणत्याही देशाने रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास अण्वस्त्रांचा वापर करण्याचा आपला अधिकार रशियाने सुरक्षित केला आहे. रशियाच्या धोरणात अण्वस्त्र प्रसार बंदी हा प्रमुख मुद्दा असला तरी ताज्या घडामोडीमुळे आपल्या विरोधात होणाऱ्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर देण्याचे रशियाचे अधिकार आता अमर्यादित झाले आहेत
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या तज्ञांचे असे मत आहे की, बायडन यांनी युक्रेनला जी मोकळीक दिली त्याला रशियाने चोख प्रतिउत्तर दिले आहे. या संदर्भात रशियाने अगोदरच संकेत दिले होते आणि रशिया आणि युक्रेन युद्धाची तीव्रता रशियाच्या ताज्या निर्णयामुळे अनेक पटींनी वाढली आहे.












Click it and Unblock the Notifications