Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेचा 'ऑईल ट्रॅप' फेल! रशिया-भारत ऑईल डीलवर रशियाचे मोठे विधान; व्हाईट हाऊसच्या गोटात अस्वस्थता

रशिया आणि भारत यांच्यातील दशकांपासून असलेल्या दृढ संबंधांमध्ये दरी निर्माण करण्याचे पाश्चात्य देशांचे प्रयत्न पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. रशियाने भारतासोबतच्या ऊर्जा भागीदारीवर अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडल्याने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारताने रशियासोबतच्या तेल व्यापारात आपली भूमिका बदलण्याचे कोणतेही कारण अस्तित्वात नाही.

Russia India Oil Deal

रशियाचा ठाम विश्वास: "भागीदारीत बदल नाही"

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी अफवांना पूर्णविराम देत सांगितले की, रशिया आणि भारत यांच्यातील ऊर्जा सहकार्य हे केवळ व्यापारापुरते मर्यादित नसून ते जागतिक ऊर्जा बाजारपेठेत स्थिरता राखण्यासाठी आवश्यक आहे. "भारताने रशियासोबतची आपली भूमिका बदलावी, असे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. हा व्यापार दोन्ही राष्ट्रांसाठी परस्पर फायदेशीर आहे," असे झाखारोवा यांनी ठामपणे नमूद केले.

याच सुरात क्रेमलिनचे प्रेस सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांनीही भारताचे समर्थन केले. त्यांनी स्पष्ट केले की, भारत हा रशियासाठी नवीन खरेदीदार नाही आणि रशिया हा भारताचा एकमेव पुरवठादार नाही. भारताने नेहमीच आपल्या गरजेनुसार विविध देशांकडून तेल खरेदी केले आहे, त्यामुळे या प्रक्रियेत काहीही 'नवीन' किंवा 'असामान्य' नाही.

संसदेत भारताची गर्जना: १४० कोटी भारतीयांची सुरक्षा सर्वोच्च

एककीडे रशियाने आपली भूमिका मांडली असताना, दुसरीकडे भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी संसदेत देशाची रणनीती स्पष्ट केली. गोयल म्हणाले, "1.4 अब्ज भारतीयांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे ही मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता पाहता, आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणणे हे आमच्या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे."

जयशंकर यांची अमेरिकेतील मुत्सद्देगिरी

विशेष म्हणजे, ही सर्व विधाने अशा वेळी येत आहेत जेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याशी इंडो-पॅसिफिक, युक्रेन संघर्ष आणि पश्चिम आशियातील तणावावर सविस्तर चर्चा केली. जयशंकर यांनी अमेरिकेसोबत खनिज सुरक्षा आणि 'फोर्ज' उपक्रमावर सहकार्य वाढवले असले, तरी रशियासोबतच्या जुन्या मैत्रीला आणि तेलाच्या व्यवहाराला धक्का लावण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

ट्रम्प यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर

"भारत आता रशियाऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल," या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मोजक्या आणि मार्मिक शब्दांत उत्तर दिले. जयस्वाल म्हणाले, "ऊर्जा सुरक्षा ही आमची प्राथमिकता असून आम्ही वस्तुनिष्ठ बाजारपेठेतील परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचा विचार करूनच निर्णय घेतो. भारताचे निर्णय हे नेहमीच देशाच्या हितासाठी असतात आणि पुढेही तसेच राहतील."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+