पुतिन यांच्याकडे आहे खास कार ! बॉम्बही कुचकामी, 6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची कार सध्या चर्चेचा विषय आहे. पुतिन हे किम जोंग यांच्यासोबत कारमध्ये बसतानाचा फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख ज्या कारमध्ये स्वार झाले ती सामान्य कार नव्हती. त्यात अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी जगातील सर्व देशांना आश्चर्यचकित करणारी आहेत.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन उत्तर कोरियात किम जोंग उनसोबत कारमध्ये बसल्याचे फोटो समोर आले आहे. दरम्यान, आता पुतिन यांच्या अधिकृत कारचीही चर्चा होत आहे. पुतिन यांची अधिकृत कार ही रेट्रो-शैलीची सोव्हिएत काळातील ZIL लिमोझिन आहे.पुतिन यांच्या कार ऑरस लिमोझिनने मर्सिडीज-बेंझ एस 600 गार्ड पुलमनची जागा घेतली. यापूर्वी, पुतिन मे महिन्यात क्रेमलिन उद्घाटन समारंभात ऑरस सिनेटमध्ये गेले होते.
विदेश दौऱ्यावरही पुतिन त्यांची कार घेऊन जातात
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन परदेश दौऱ्यावरही ही कार सोबत घेऊन जातात.पुतिन ज्यावेळी परदेश करत असतात. त्यावेळी त्या देशात इलुशिन IL-76 वाहतूक विमानाद्वारे ती कार त्या देशात त्यांच्या ताफ्यात असते. या ताफ्यात सहसा उरल किंवा बीएमडब्ल्यू मोटरसायकलद्वारे एस्कॉर्ट केले जाते. मर्सिडीज जी-क्लास, मर्सिडीज ई-क्लास, एस-क्लास, बीएमडब्ल्यू 5 सीरीज, फोक्सवॅगन कॅराव्हेल या हायटेक वाहनांचा पुतीन यांच्या ताफ्यात समावेश असतो.
पुतिन यांच्या कार ऑरस सिनेटमध्ये काय खास आहे?
राष्ट्रपतींच्या कारमध्ये जे आवश्यक सुविधा असायला हव्यात त्या सर्व सुविधायुक्त अशी ही कार आहे. या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षितता आणि कम्युनिकेशनसंदर्भातील आश्चर्य चकित करणारे फीचर्स उपलब्ध आहेत. ही कार पूर्णपणे बुलेटप्रुफ असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, पुतिन यांच्या गाडीवरही बॉम्बचा कोणताही परिणाम होत नाही. जरी या कारबद्दल जास्त माहिती कधीच समोर आलेली नाही. ही कार पूर्णपणे आर्मर्ड आहे, ती 4.4-लिटर ट्विन-टर्बो V8 वापर करण्यात आला आहे. ही कार फक्त 6 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडते. कारचा कमाल वेग ताशी 249 किमी आहे.












Click it and Unblock the Notifications