पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर, 'ते' स्वप्न पूर्ण होणार...
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवार ८ जुलैपासून तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहेत. ते 10 जुलैपर्यंत रशियात असतील. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच रशियाला गेले आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ते भेट घेणार असून, यावेळी दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वाचा करार होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

या दौऱ्यात 'हे' होऊ शकतं...
भारताला सतत अडथळे आणणाऱ्या चीन आणि पाकिस्तानचं या दौऱ्यामुळे टेन्शन वाढलं आहे. रशिया भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश राहिला आहे. सुरुवातीपासून भारताची रशियासोबत चांगली मैत्री आहे. मोदींच्या या दौऱ्यात रशियाकडून भारताला एक असं शस्त्र मिळू शकतं, त्यामुळे अनेक देशांची झोप उडेल.
भारत आणि रशियामध्ये Su-57 चा खरेदी करार होऊ शकतो. Su-57 हे पाचव्या पिढीच अत्याधुनिक फायटर जेट आहे. रशिया जॉईंट प्रोडोक्शनचा प्रस्ताव भारताला देऊ शकतो. Su-57 ची निर्मिती करणाऱ्या रोसोबोरो एक्सपोर्टच्या CEO ने मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतासमोर हा प्रस्ताव मांडला होता.
पाचव्या पिढीच फायटर जेट विकसित करण सोप नाहीय. शत्रूसाठी हे सर्वात धोकादायक विमान आहे. भारतासमोर अडचण ही आहे की, एअर फोर्ससाठीच AMCA प्रोजेक्ट पूर्ण व्हायला अजून 10 वर्ष लागतील. त्याचवेळी चीनकडे पाचव्या पिढीची 200 फायटर जेट्स आहेत.
फायटर जेट किंमत किती...
पाकिस्तानला 2030 पर्यंत चीन किंवा टर्कीकडून पाचव्या पिढीच फायटर जेट मिळू शकतं. त्याआधी भारताने रशिया किंवा अमेरिकेकडून पाचव्या पिढीच फायटर जेट विकत घेणं आवश्यक आहे. पाचव्या पिढीच्या फायटर जेटची किंमत देखील जास्त आहे. काही हजार कोटींमध्ये एका विमानाची किंमत आहे. हा खर्च परवडणारा नाहीय. त्यामुळे रशिया भारताला सह उत्पादनाची ऑफर देत आहे.
भारताची ताकद वाढेल...
आज भारताकडे रशियन बनावटीची सर्वाधिक फायटर जेट्स आहेत. त्याशिवाय रणगाडे सुद्धा रशियन बनावटीचे आहेत. भारतीय सैन्य पथकांना रशियन शस्त्रास्त्र हाताळण्याचा दीर्घ अनुभव आहे. SU-57 चा करार झाला, तर इंडियन एअर फोर्सची ताकद कैकपटीने वाढेल. या करारामुळे चीन किंवा पाकीस्थानकडून भविष्यातील धोक्यालाही लगाम लागला जावू शकतो.












Click it and Unblock the Notifications