अनुरा कुमारा दिसानायके होणार श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, सगळ्यांना मागे टाकत असे पोहोचले या पदावर
Sri Lanka Presidential Election: श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी सुरू असलेली मतमोजणी आता संपली आहे. यासह मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती झाले आहेत. होय...त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे.
श्रीलंकेत पहिल्यांदाच डाव्या विचारसरणीचा नेता राष्ट्रपतींच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे. वृत्तानुसार, मतदारांच्या मोठ्या वर्गाने अनुरा कुमारा दिसानायके यांना अध्यक्षपदासाठी निवडले. यासह दिसानायके यांनी या निवडणुकीत त्यांच्या तीन प्रसिद्ध प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आहे.

दरम्यान दिसानायके यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नमल राजपक्षे, साजिद प्रेमदासा आणि रानिल विक्रमसिंघे यांचा पराभव केला . जनता विमुक्ती पेरामुना (JVP) पक्षाचे नेते दिसानायके या निवडणुकीत NPP आघाडीकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनले होते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अनुरा दिसानायकेची राष्ट्रपती होण्याची कहाणी खूपच रंजक आहे.
मजुराच्या घरात जन्म झाला
एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अनुरा दिसानायके यांची राष्ट्रपती होण्याची कहाणी खूपच रंजक आहे. वृत्तानुसार, श्रीलंकेची राजधानी कोलंबोपासून काही अंतरावर असलेल्या थम्बुथ्रीगामा येथील एका रोजंदारी मजुराच्या घरात अनुरा दिसानायकेचा जन्म झाला.
सुरुवातीला पेराडेनिया विद्यापीठात प्रवेश घेतला. परंतु, त्यांच्या राजकीय विचारसरणीमुळे धमक्या मिळाल्यानंतर ते केलनिया विद्यापीठात गेले. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात सरकारविरोधी आंदोलनादरम्यान जेव्हीपीमध्ये सामील होऊन दिसानायके यांनी त्यांच्या विद्यापीठाच्या काळातच राजकारणात प्रवेश केला.
दिसानायके यांचा पक्ष हिंसाचारात सहभागी होता
वामपंथी दिसानायके कॉलेजमध्ये असतानाच जेव्हीपीमध्ये सामील झाले. 80 च्या दशकात जेव्हीपीने सरकारच्या विरोधात सशस्त्र बंड केले आणि मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. याला श्रीलंकेचा रक्तरंजित कालखंड असेही म्हणतात. सरकारने हे बंड चिरडून टाकले आणि JVP संस्थापक रोहना विजवीरा यांनाही मारण्यात आले. नंतर दिसानायके आणि जेव्हीपीने स्वतःला हिंसेच्या मार्गापासून दूर केले. दिसानायके 2000 मध्ये खासदार झाले आणि त्यानंतर श्रीलंका फ्रीडम पार्टी (SLFP) सोबत युती केल्यानंतर 2004 मध्ये त्यांना कृषी आणि पाटबंधारे मंत्री करण्यात आले. दरम्यान युतीमधील मतभेदांमुळे दिसानायके यांनी 2005 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
2014 मध्ये दिसानायके सोमवंश अमरसिंघे यांच्यानंतर जेव्हीपीचे अध्यक्ष झाले. नेतृत्व स्वीकारल्यानंतर दिसानायके यांनी 1971 आणि 1987 च्या बंडखोरीशी संबंधित हिंसक भूतकाळापासून दूर राहून पक्षाची प्रतिमा बदलली. त्या काळात पक्षाच्या भूमिकेबद्दल त्यांनी जाहीरपणे खंतही व्यक्त केली. दिसानायके 2019 मध्ये प्रथमच राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरले परंतु ते वाईटरित्या पराभूत झाले आणि त्यांना केवळ 3 टक्के मते मिळाली. 2022 मध्ये श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर JVP ने एक जोरदार मोहीम सुरू केली आणि भ्रष्टाचार विरोधी नेता म्हणून स्वतःला सादर करण्यात यश मिळविले. दोन वर्षांत दिसानायके श्रीलंकेचा सर्वात मोठा नेता बनला.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications