पंतप्रधान मोदींची व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा, युक्रेन दौ-याबाबत दिली माहिती
Putin-Modi Talk : युक्रेन दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील प्रमुख देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांशी चर्चा करत आहेत. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्षाबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले. पुतिन यांची प्रतिक्रियाही जाणून घेतली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना त्यांच्या युक्रेन दौ-्याचीही माहिती दिली.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केल्याचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि नुकत्याच झालेल्या युक्रेन भेटीबद्दल त्यांनी चर्चा केल्याचे म्हटले आहे. संघर्षाच्या लवकर, कायम आणि शांततापूर्ण निराकारणासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली. पीएम मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवर या चर्चेची माहिती दिली होती. त्यांच्यात आणि बायडेन यांच्यात अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे पंतप्रधानांनी एक्स पोस्टमध्ये सांगितले होते.
बांगलादेशातील अल्पसंख्याकांची परिस्थिती आणि युक्रेनमधील परिस्थिती यावर झालेली चर्चा सर्वात महत्त्वाची होती. यानंतर पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशीही चर्चा केली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान अल्बानीज यांनी द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीबद्दल आणि बहुराष्ट्रीय व्यासपीठांवर सहकार्याबद्दल चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी नुकतीच केला युक्रेन दौरा
पंतप्रधान मोदी 23 ऑगस्ट रोजी युक्रेनमध्ये होते. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी केवळ द्विपक्षीय चर्चाच केली नाही, तर युक्रेनियन भूमीवरील हे युद्ध संपवण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या उपायांवर चर्चा केली. एवढेच नाही तर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की असेही म्हणाले होते की जर भारताने युक्रेनबाबत शांतता चर्चेचे आयोजन केले तर ते यायला तयार आहेत.












Click it and Unblock the Notifications