Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऐतिहासिक करार, दहशतवादावर कडा प्रहार! PM मोदींच्या मलेशिया दौऱ्यातील 10 महत्त्वाच्या गोष्टी वाचा

PM Modi Malaysia Visit 2026 : "दोन समुद्री शेजारी, एक सामायिक भविष्य असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशिया दौऱ्याने आशियाई राजकारणात नव्या 'व्यापक धोरणात्मक भागीदारी'चा पाया रचला आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड नाही, असा कडक इशारा देत मोदींनी मलेशियासोबत संरक्षणापासून ते सेमीकंडक्टरपर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या करारांना अंतिम स्वरूप दिले. मलेशियातील ३० लाख भारतीय समुदायाला 'लिव्हिंग ब्रिज' संबोधत मोदींनी ही मैत्री केवळ सरकारापुरती मर्यादित नसून ती जनसामान्यांच्या हृदयात असल्याचे अधोरेखित केले आहे. भारत आणि मलेशियाचा हा 'हातमिळवणी'चा प्रवास आता जागतिक शांततेचा नवा मंत्र ठरणार आहे..."

PM Modi Malaysia Visit 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्याने दोन्ही देशांमधील संबंधांना एका ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवले आहे. कुआलालंपुर येथे पंतप्रधान मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर (MoUs) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांतील प्रगती एकमेकांशी जोडलेली असून ही भागीदारी प्रादेशिक स्थिरतेसाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्यातील १० महत्त्वाच्या गोष्टी

१. ऐतिहासिक करार

दोन्ही देशांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार निर्मूलन, सेमीकंडक्टर विकास आणि संरक्षण यांसह अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

२. दहशतवादावर कडक प्रहार

दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतेही 'दुहेरी निकष' चालणार नाहीत आणि याविरोधात भारत-मलेशिया एकत्र लढतील, असा ठाम निर्धार मोदींनी व्यक्त केला.

३. संरक्षण सहकार्य

संरक्षण आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. मलेशिया भारताकडून 'डोर्नियर' (Dornier) विमान खरेदी करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

४. डिजिटल अर्थव्यवस्था

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डिजिटल अर्थव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्रात दोन्ही देश आपापसातील भागीदारी अधिक दृढ करणार आहेत.

५. भारतीय समुदाय

मलेशियातील ३० लाख भारतीय वंशाचे लोक दोन्ही देशांमधील 'जीता-जागता दुवा' असल्याचे सांगत मोदींनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

६. सांस्कृतिक आणि शैक्षणिक बंध

तामिळ भाषेसह सांस्कृतिक संबंधांवर जोर देण्यात आला. ऑडिओ व्हिज्युअल कराराद्वारे तामिळ चित्रपट आणि संगीताच्या देवाणघेवाणीला चालना मिळेल.

७. युकांसाठी पुढाकार

विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, कौशल्य विकास आणि स्टार्टअप कार्यक्रमांसाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

८. आसियान नेतृत्व

मलेशियाच्या आसियान अध्यक्षपदाचे कौतुक करत मोदींनी भारत आणि आग्नेय आशियाई देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वास व्यक्त केला.

९. व्यापार समीक्षा

'आसियान-भारत वस्तू व्यापार करारा'ची लवकरात लवकर समीक्षा पूर्ण करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

१०. आझाद हिंद फौजेचा सन्मान

पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यात आझाद हिंद फौजेच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्या त्यागाचे स्मरण केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+