भीषण! 'एअर शो'वेळी विमान क्रॅश, क्षणात स्फोट अन् आगीच्या ज्वाळा, पायलट ठार, थरारक VIDEO आला समोर
Plane Accident f 16 jet crashes during airshow f 16 jet crashes : एअर शोदरम्यान भीषण अपघात होऊन F-16 जेट गटांगळ्या खात जमिनीवर आदळून अनेक मीटर फरफटत गेले. यानंतर, ढिगाऱ्यात मोठा स्फोट होऊन आगीचा भडका झाला आणि यातच वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही भीषण घटना घडल्यानंतर आता या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

कुठे घडली घटना?
ही घटना पोलंडमध्ये घडली असून या व्हिडिओ पाहून मनही स्तब्धः होते. पोलंडमध्ये होणाऱ्या 'रॅडोम एअर शो २०२५' (Radom Air Show 2025) च्या आधी गुरुवारी संध्याकाळी एक मोठा अपघात झाला. पोलिश हवाई दलाचे (Polish Air Force) F-16 लढाऊ विमान सरावा दरम्यान कोसळले.
🚨🇵🇱 BREAKING: JET CRASHES AND EXPLODES AT POLAND AIR SHOW
— Mario Nawfal (@MarioNawfal) August 28, 2025
An F-16 fighter jet went down during the Radom Air Show in Poland.
The aircraft reportedly crashed while performing at the event, which is one of the largest aviation shows in the country.
Emergency crews are on site… pic.twitter.com/fE9Vc0ggbF
कधी घडली घटना?
स्थानिक वेळेनुसार २८ ऑगस्टला संध्याकाळी ७:३० वाजता (१७:३० GMT) हा अपघात झाला, जेव्हा विमान धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर नियंत्रण गमावून बसले आणि जमिनीवर आदळताच त्याचा आगीचा गोळा झाला. या अपघातात एका अनुभवी वैमानिकाचा मृत्यू झाला.
अनेक मीटरपर्यंत फरफटत गेला विमान
व्हिडिओ फुटेजमध्ये दिसले की जेटने अचानक 'नोझ डाईव्ह' (सरळ खाली येणे) केले आणि जमिनीवर आदळताच जोरदार स्फोटासह आगीच्या ज्वाळांमध्ये वेढले जाऊन अनेक मीटरपर्यंत फरफटत गेले.
अपघातात वैमानिकाचा मृत्यू
या अपघातात विमानातील वैमानिकाचा मृत्यू झाला. स्थानिक वृत्तानुसार, वैमानिकाने विमानातून बाहेर पडण्याचा (eject) प्रयत्न केला नाही. वैमानिक नाटोच्या 'टायगर डेमो' या विशेष हवाई युनिटचा भाग होते आणि त्यांच्या शौर्य आणि समर्पणासाठी ते ओळखले जात होते.
पोलंडच्या संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
पोलंडचे संरक्षणमंत्री व्लादिस्लाव कोसीनियाक-कमीश (Wladyslaw Kosiniak-Kamysz) स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले - 'पोलिश आर्मीचे एक वैमानिक F-16 अपघातात शहीद झाले - त्यांनी नेहमीच देशाची सेवा समर्पण आणि शौर्याने केली. मी त्यांना नमन करतो.'
अपघातानंतर एअर शो रद्द
दरम्यान एवढा मोठा भीषण अपघात झाल्यानंतर एअर शो रद्द करण्यात आला. यासह या आठवड्यात होणारा राडोम एअर शो २०२५ ठरल्यानुसार रद्द करण्यात आला असल्याचे वनइंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications