बापरे..! क्षेपणास्त्राचा काळजाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ; पहा इराण-इस्त्रायल युद्धाची भिषणता
Iran Attacked on Israel : इराण व इस्त्रायल युद्धाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी इराणकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला केला जात असल्याचा एक भयावह व्हिडीओ दुबईच्या फ्लाइटमधील एका प्रवाशाने रेकॉर्ड केला. न्यूयॉर्क पोस्टने हा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यानंतर या युद्धाची दाहकता, अनेकांना धडकी भरवणारी ठरली. या व्हिडीओतून या क्षेपणास्त्र हल्ल्याची तीव्रता दिसून येते.
इराणकडून 180 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले, असे इस्रायलने स्पष्ट केले. ही क्षेपणास्त्रे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने व अमेरिकन नौदलाने रोखली. इस्रायल संरक्षण दलानेही प्रत्युत्तर करण्याची धमकी दिल्याने भीषण युद्धाची शक्यता वाढली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही शत्रू राष्ट्राला कठोर शब्दांत दम भरला. या क्षेपणास्त्र हल्ल्याची किंमत इराणला चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही बदला घेतल्यास प्रचंड नुकसान होईल, असा इशारा तेहरानने दिला आहे. यामुळे मध्य पूर्वेमधील मोठ्या भूभागावर युद्धाची भीती निर्माण झाली आहे.

इराणने मोठी चूक केली
या हल्ल्यानंतर अमेरिकेने आपला जुना मित्र इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे स्वतः रात्री उशिरापर्यंत इराणच्या हल्ल्यावर लक्ष ठेवून होते. इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट आणि क्षेपणास्त्रे तातडीने पाडण्याचे आदेश दिले त्यांनी यूएस नेव्हीला दिले. दुसरीकडे इराणच्या सशस्त्र दलानेही जोरदार हल्ला केला जाईल, अशी स्पष्टोक्ती दिली. एका निवेदनानुसार, राजकीय-सुरक्षा बैठकीपूर्वी नेतान्याहू यांनी, "इराणने रात्री मोठी चूक केली आहे. त्याचा भरपाई त्यांना करावीच लागेल, असा इशारा दिलाय. तत्पूर्वी, इस्रायली सैन्याने मुसलमान, ईसाई आणि यहूदींसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या जेरुसलेमच्या जुन्या शहरावर इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव सोशल मीडिया पोस्टवर व्हायरल केला.
डागली 180 बँलेस्टिक क्षेपणास्त्रे
गेल्या दोन आठवड्यापासून लेबनानने इस्त्रायलवर हल्ले वाढवले आहेत. इराणने मंगळवारी केलेल्या हल्ल्यात इस्रायलवर 180 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली, असे इस्रायलने म्हटले आहे. त्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये अलार्म वाजू लागले आणि जेरुसलेम आणि जॉर्डन नदीच्या खोऱ्यात स्फोटांचे आवाज ऐकू आले.
इराणने केला हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर
इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या नागरिकांनी बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये सहारा घेतला. तेथील स्थानिक टिव्हीचे पत्रकारांही जमिनीवर पडलेले दिसले. रिव्होल्युशनरी गार्ड्सने सांगितले की इराणच्या सैन्याने प्रथमच हायपरसॉनिक फताह क्षेपणास्त्रांचा वापर केला. मात्र त्यापैकी 90% क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या परतून लावले.
EXCLUSIVE: Video from passenger jet en route to Dubai, shows missiles firing out of Iran towards Israel pic.twitter.com/6VUv9OlDUM
— New York Post (@nypost) October 2, 2024












Click it and Unblock the Notifications