आधीच गरीबी अन् त्यात कुरापती! भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानकडे फक्त 4 दिवसांचा दारूगोळा शिल्लक!

Pakistan war fighting capability limited to 4 days : पाकिस्तानची स्थिती अशी केविलवाणी आहे पण या देशाची कुरापतीखोर म्हणून ओळख आहे. हा देश दहशतवादाला खतपाणी तर घालतोच पण भारताविरुद्ध त्यांना फितवतो, त्यांना साथही देतो. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध तणावाचे बनले आहे, या स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष उभा राहत आहे. अशातच दोन्ही देशांकडे किती शस्त्र, दारुगोळा आणि सैन्य यांची आता तुलना होत आहे. वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानकडे चार दिवस पुरेल इतकाच दारुगोळा आहे.

pakistan war fighting capability limited

पाकिस्तानने का विकली शस्त्रास्त्रे

पाकिस्तानमध्ये गरिबी आणि उपासमारीची परिस्थिती शिगेला पोहोचली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला शस्त्रास्त्र युक्रेनला विकावी लागली. यातून देशातील आवश्यक वस्तूंचा पुरवठा करता येईल हा यामागील उद्देश होता.

Take a Poll

वृत्तानुसार, तसे पाहता पाकिस्तानकडे कापूस किंवा कपडे वगळता इतर देशांना विकण्यासाठी फारसे काही नाही, पण रशिया-युक्रेन युद्ध सुरू होताच, पाकिस्तानने पैसे कमवण्याचा विचार केला आणि इतर देशांकडून खरेदी केलेला दारूगोळा आणि इतर लष्करी उपकरणे युक्रेनला विकली. त्यामुळे, पाकिस्तानी सैन्याला दारूगोळ्याची तीव्र कमतरता भासत आहे, ज्यामुळे त्यांच्याकडे चार दिवसांपेक्षा जास्त काळ युद्ध लढण्याची क्षमता नाही.

पाकिस्तानकडे शस्त्र बनवण्याची क्षमता नाही..?

पाकिस्तानची ही अवस्था युक्रेनसोबतच्या अलिकडच्या शस्त्रास्त्र व्यवहारांमुळे आली आहे, ज्यामुळे त्याचे युद्ध साठे कमी झाले आहेत. पाकिस्तानात एवढ्या समस्या आहेत की, त्यांना त्यांच्या दारुगोळ्याचे, शस्त्रास्त्राचे उत्पादन लवकर सुरु करता आले नाही. ही गोदामे पुन्हा भरली असती, परंतु पाकिस्तानला इतरही समस्या आहेत, त्यामुळेच पाकिस्तानकडे शस्त्रे बनवण्याची क्षमता नाही.

शस्त्रांची निर्यात सोडा पाकिस्तान आयातही करु शकत नाही

रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि मध्य पूर्वेतील सीरिया, इस्रायल, इराण, गाझा आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात आधीच कमतरता आहे, पाकिस्तान शस्त्रे आयात करण्याच्या स्थितीतही नाही. दुसरीकडे, पीओएफ (पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरी) मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा तयार करण्याची क्षमता नाही, त्यामुळे या परिस्थितीमुळे पाकिस्तानी सैन्याला अनिश्चित स्थितीत आणले आहे, ज्यांचा दारूगोळा साठा फक्त 96 तासांच्या युद्धात टिकू शकतो असे या वृत्तात म्हटले आहे.

पाकिस्तानकडे कोणत्या शस्त्रांचा अभाव आहे

पाकिस्तानकडे काही शस्त्रांचा अभाव आहे, कमतरतेचा परिणाम पाकिस्तानच्या लष्करी रणनीतीवरही होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे आणि आता पाकिस्तानला शस्त्र आयात करण्याशिवाय पर्याय नाही.

पाकिस्तानच्या शस्त्रसंबंधी काय आहेत कमतरता

  • पाकिस्तानच्या हॉवित्झर तोफांसाठी पुरेशा तोफखान्याचा अभाव आहे.
  • रॉकेट लाँचर सिस्टीमसाठी रॉकेटचा अभाव आहे.
  • संभाव्य हल्ल्यापासून बचाव करण्याची पाकिस्तानची क्षमता कमी झाली आहे.

पाकिस्तानच्या युद्धनीतीनुसार, युद्ध परिस्थितीत पाकिस्तानी सैन्य प्रथम तोफखाना आणि चिलखती तुकड्या तैनात करते. पण १५५ मिमी आणि १२२ मिमी दारूगोळा नसल्यास, त्या हालचाली करण्यासाठी त्याच्याकडे जास्त ताकद नाही.

पाकिस्तानने कोणत्या शस्त्रांचा साठा संपवला आहे?

  • युक्रेनला १५५ मिमी दारूगोळा विकल्याने आता पाकिस्तानसमोर पेच आहे.
  • पाकिस्तानकडे स्वयंचलित आणि माउंटेड गन सिस्टीमचा साठा संपला आहे.
  • आता पाकिस्तानला मोठ्या सुरक्षा संकटाचा सामना करावा लागत आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+