रमजानच्या आधी पाकिस्तानच्या मदरशात बॉम्बस्फोट, 5 ठार; त्या मदरशाला का म्हणतात 'जिहादी कारखाना'?
Pakistan Madrasa Bomb Blast : पाकिस्तानच्या वायव्य भागातील एका मदरशात झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे परिसरात दहशत पसरली आहे. या हल्ल्यात किमान 5 जण ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. रमजानचा पवित्र महिना सुरू होण्यापूर्वी लोक नमाज अदा करत असताना हा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अकोरा खट्टक जिल्ह्यात असलेल्या जामिया हक्कानिया मदरशात हा स्फोट झाला, जो अफगाण तालिबानशी जोडला गेला असल्याचे मानले जाते.
पोलिस विभागाचे प्रमुख अब्दुल रशीद यांनी सांगितले की, स्फोटानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली?
आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु यामागे एखाद्या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानी सुरक्षा संस्था या हल्ल्याचा सखोल तपास करत आहेत.
BREAKING!! 🚨
— Afghanistan Diary 🏳️ 🇦🇫 (@AFGDiary2025) February 28, 2025
An explosion was heard during Friday prayers in Darul uloom Haqqani Madrrasah, Akora Khattak, Nowshera, KPK, Pakistan.
There are reports of multiple casualties. ISKP the primary suspect behind the attack.@RajaMuneeb @analysis_011 @IbnSufyan313 pic.twitter.com/4y9PAIHsUu
रमजानपूर्वी हिंसाचार?
रमजान महिना सुरू होत असताना हा हल्ला झाला आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, चंद्र दिसण्यावर अवलंबून रमजान शनिवारी किंवा रविवारी सुरू होऊ शकतो. त्यामुळे रमजानपूर्वी असा हल्ला होणे ही चिंतेची बाब असल्याचे लोकांमधून व्यक्त केली जात आहे.
मदरशाला 'जिहादचा कारखाना' का म्हणतात!
जामिया हक्कानिया मदरसा तिच्या कट्टरपंथी विचारसरणीसाठी ओळखला जातो. तालिबानी लढवय्यांना येथून प्रशिक्षण दिले जात असल्याने याला 'जिहादचा कारखाना' असेही म्हणतात. या विशाल मदरशात सुमारे चार हजार विद्यार्थी राहतात, ज्यांना मोफत जेवण, कपडे आणि शिक्षण दिले जाते. गेल्या काही दशकांपासून, अनेक पाकिस्तानी मदरसे कट्टरतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत, जिथे विद्यार्थ्यांना मौलवींच्या प्रक्षोभक भाषणांशिवाय इतर कोणतेही शैक्षणिक पर्याय नव्हते.
या प्रकरणाची चौकशी सुरू
पाकिस्तानमध्ये यापूर्वीही मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यानंतर, पुढील कोणतीही घटना टाळण्यासाठी परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परंतु, अशा हल्ल्याच्या घटना वारंवार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications