Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आधी ट्रेन अपहरण आता बलुच आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर आत्मघातकी हल्ला: 90 सैनिक ठार केल्याचा दावा

Pakistan News BLA Attack on PAK Army Convoy : बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने रविवारी पाकिस्तानी सैन्यावर आत्मघातकी हल्ला केल्याचा दावा केला.

BLAच्या मते, त्यांच्या माजीद ब्रिगेड आणि फतेह ब्रिगेडने लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला. यामध्ये 90 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बीएलएच्या मते, क्वेट्टाहून कफ्तानला जाणाऱ्या 8 लष्करी वाहनांवर हल्ला करण्यात आला. नोश्की येथील महामार्गाजवळ आत्मघातकी दहशतवाद्यांनी वाहनांना लक्ष्य केले.

नोश्कीचे एसएचओ जफरउल्लाह सुलेमानी म्हणाले की, एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्कराच्या ताफ्यावर धडकवले.

Pakistan News

यानंतर, बीएलएच्या फतेह पथकाच्या सैनिकांनी सैन्याच्या ताफ्यात घुसून सैनिकांना ठार मारले. ज्या वाहनावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

सुलेमानी यांच्या म्हणण्यानुसार, जखमींना नोश्की येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. फक्त ५ दिवसांपूर्वी बीएलएने एका प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते. त्यातून महिला आणि मुलांना बाहेर काढण्यात आले.

हे ही वाचा : पाकिस्तानात ट्रेन हायजॅक करणारी बलुचिस्तान लिबरल आर्मी कोण?, जाणून घ्या त्यांच्याविषयी सर्व काही

5 दिवसांपूर्वी बीएलएने ट्रेनचे केले होते अपहरण

यापूर्वी 11 मार्च रोजी बीएलएने क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर पॅसेंजर ट्रेनचे अपहरण केले होते. मंगळवारी सकाळी 9 वाजता जाफर एक्सप्रेस क्वेट्टाहून पेशावरला रवाना झाली. सिबी येथे पोहोचण्याची वेळ दुपारी दीड वाजता होती.

तत्पूर्वी, दुपारी 1 वाजताच्या सुमारास, बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यातील मशकाफ भागात बलुच लिबरेशन आर्मीने हा हल्ला केला. हा एक डोंगराळ भाग आहे, जिथे 17 बोगदे आहेत, त्यामुळे ट्रेन मंद गतीने चालवावी लागते. याचा फायदा घेत बीएलएने ट्रेनवर हल्ला केला.

सर्वप्रथम, बलुच आर्मीने मश्काफमधील बोगदा क्रमांक-8 मधील रेल्वे ट्रॅक उडवून दिला. यामुळे जाफर एक्सप्रेस रुळावरून घसरली. यानंतर बीएलएने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात ट्रेन चालकही जखमी झाला.

या ट्रेनमध्ये सुरक्षा दल, पोलिस आणि आयएसआय एजंट प्रवास करत होते. सगळे पंजाबला जाणार होते. त्यांनी बीएलएच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, परंतु बीएलएने ट्रेन ताब्यात घेतली. या दरम्यान अनेक सुरक्षा कर्मचारी मारले गेले.

घटनेची माहिती मिळताच, पाकिस्तानी सैन्याने जमिनीवरून बीएलएवर गोळीबार केला आणि हवेतून बॉम्बही टाकले, परंतु बीएलएच्या सैनिकांनी कसा तरी लष्कराचे जमिनीवरील ऑपरेशन थांबवले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+