पाकिस्तानला अतिरेकी सुधरू देईना..! बलुचिस्तानमध्ये बलूच फुटीरतावाद्यांचा मोठा हल्ला, 17 सैनिक ठार
Pakistan News : भारताशी दुश्मनी बाळगणाऱ्या पाकिस्तानच्या सतत काही ना काही कुरापती सुरुच आहेत. ज्या दहशतवाद्यांशी आणि फुटीरतावाद्यांचे पाकिस्तानने लांगूलचालन केले तेच आता त्यांच्यावर उलटत आहेत. अतिरेकी हल्ल्यांनी पाकिस्तानात आता अनागोंदी माजलेली आहे. हे काही कमी नसतानाच बलुचिस्तानमध्ये बलूच फुटीरतावाद्यांचा मोठा हल्ला केला आहे. त्यात 17 सैनिक ठार झाले आहेत.
बलुच फुटीरतावाद्यांनी शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला जोरदार हल्ला करण्यात आला, खोरासान डायरी न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात 17 पाकिस्तानी सैनिक मारले गेले.

बलुचिस्तानमधील कलात जिल्ह्यातील मंगोचर भागात असलेल्या फ्रंटियर कॉर्प्स कॅम्पवर सशस्त्र फुटीरतावादी गटाने हा हल्ला केला. हल्ल्यानंतर बलुच फुटीरतावाद्यांनी रात्रभर पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार सुरू ठेवला. याशिवाय अतिरेक्यांनी क्वेटा-कराची राष्ट्रीय महामार्गावर कब्जा केला आणि पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केले.
राष्ट्रीय महामार्गावरील हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू
एका अहवालात म्हटले आहे की, सर्वाधिक मृत्यू राष्ट्रीय महामार्गावरील हल्ल्यात झाले आहेत, जेथे पाकिस्तानी लष्कराचे वाहन लक्ष्य होते.
वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले
जिल्ह्यात बलूच हल्लेखोरांनी वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले, रात्रभर गोळीबार सुरू होता. कलातच्या सहाय्यक आयुक्तांच्या निवासस्थानावरही हल्ला करण्यात आला आणि खालिक आबादमध्ये बसेसवर गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी लष्कराचा दावा दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने खैबर पख्तूनख्वामध्ये पाच वेगवेगळ्या कारवाईत 10 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानी लष्कराविरुद्ध अतिरेकी हल्ले वाढले
अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या पुनरागमनानंतर बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये पाकिस्तानी लष्कराविरुद्ध अतिरेकी हल्ले वाढले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील गोळीबार आता थांबला आहे, परंतु परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.












Click it and Unblock the Notifications