सरफिऱ्या 'आशिक'ने केली पाकिस्तानी टिकटाॅक स्टार सनाची हत्या, 'हे' धक्कादायक कारण, मारेकरी कोण? वाचा
Pakistan islamabad tiktok star sana yousaf murder case : पाकिस्तानी टिकटाॅक स्टार आणि सौंदर्याची खान असलेली अवघ्या सतरा वर्षीय सना युसूफ हिच्यावर धाड्धाड् गोळ्या झाडून तिचा खून करण्यात आला होता. सोमवारी 2 जून 2025 रोजी रात्री तिच्या घरात तिच्यावर फायरिंग करण्यात आली होती. या हत्येने इस्लामाबादेत एकच खळबळ उडाली होती, आता या हत्येचा उलगडा झाला आहे.
सतरा वर्षीय टिकटॉक स्टार सना युसूफ ही सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय होती आणि तिच्या मृत्यूमुळे ऑनलाइन जगतात मोठा धक्का बसला आहे. वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या मदतीने संशयित आरोपीला फैसलाबाद येथून अटक केली आहे. हत्येत वापरलेले पिस्तूल आणि सनाचा मोबाईल फोन त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

आरोपी दहावी पास, बेरोजगार
संशयीत आरोपीचे नाव पोलिसांनी अजून उघड केलेले नाही पण तो सनाचा दुरचा नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. तो फैसलाबाद येथून आला होता आणि नातेवाईक असल्याचे भासवून सनाच्या घरात घुसखोरी केली होती. संशयित आरोपी दहावी पास असून बेरोजगार आहे, तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सनाला केले होते प्रपोज..!
मीडीया रिपोर्टनुसार, संशयित आरोपीने अनेक वेळा सनाला प्रपोज केले होते, परंतु सनाने प्रत्येक वेळी त्याला नकार दिला होता. यामुळे त्याच्या मनात राग होता. या रागातून त्याने सनाला संपवल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे.
आरोपीने कसा केला सनाचा खून?
इस्लामाबादच्या पॉश भागात जी-13 मध्ये सोमवारी 2 जून रोजी रात्री सनाच्या घरात एक तरुण आला आपण नातेवाईक असल्याचे त्याने सांगितले, त्यानंतर तो काही सेकंद तिच्याशी बोलला आणि नंतर त्याने सनावर गोळीबार केला. या हल्ल्यात सनाच्या छातीत दोन गोळ्या लागल्या. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सनाचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पुरावे मिटवण्याच्या इराद्याने सनाचा मोबाईल फोनही सोबत नेला होता. या प्रकरणी सनाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित मारेकऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
इंस्टाग्रामवर सनाची पोस्ट
sana (@sanayousaf22) ने शेअर केलेली पोस्ट
कोण आहे सनाचा मारेकरी?
वनइंडिया हिंदीनुसार, इस्लामाबादचे पोलिस प्रमुख अली नासिर रिझवी यांनी सांगितले की, 22 वर्षीय मुलगा हा या प्रकरणात संशयित आरोपी आहे, त्याला फैसलाबाद येथून अटक करण्यात आली. तो मॅट्रिक पास असून बेरोजगार आहे, तो अत्यंत गरीब कुटुंबातील असून मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
'माझी हो, नाहीतर मर!' पाठलाग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज
पोलिसांनी सांगितल्यानुसार, 'माझी हो, नाहीतर मर!' असे आरोपीने सनाला म्हटले होते, यासह त्याने अनेक वेळा प्रपोजही केले होते. प्रत्येक वेळी त्याला नकार देण्यात आला. सनाने त्याचा प्रस्ताव अनेक वेळा नाकारला म्हणून तो रागात होता. 29 मे रोजी सनाचा वाढदिवस होता. त्या दिवसापासून आरोपी तिचा पाठलाग करत होता. तो सात ते आठ सनाला भेटण्याचा प्रयत्न करत राहिला हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. 2 जून रोजी तो पुन्हा घरी आला, यावेळी त्याचा खुनाचा हेतू होता.












Click it and Unblock the Notifications