Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानी हवाई दलाचा 'या' देशातील स्थळांर भीषण एअरस्ट्राइक!; 17 निष्पाप नागरीकांचा मृत्यू

Pakistan airstrike afghanistan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या पक्तिका आणि नंगरहार प्रांतांत भीषण बॉम्बहल्ला केला. या एअरस्ट्राइकमुळे अफगाणिस्तानमधील गनी खेलो आणि गरदा सामिया हे भाग हादरून गेले आहेत. या हल्ल्यात एका मदरशासह निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले असून, यात १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबान प्रशासनाने केला आहे.

Pakistan airstrike afghanistan

बदल्याची कारवाई की मजबुरी?

पाकिस्तानी सूत्रांनुसार, ही कारवाई 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) आणि 'IS-K' या दहशतवादी संघटनांच्या तळांना नष्ट करण्यासाठी करण्यात आली. अलीकडेच इस्लामाबाद, बाजौर आणि बन्नू येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यांमुळे पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा हादरली होती. या रक्तापाताचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.

मदरसा झाला जमीनदोस्त

पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात पाकिस्तानी विमानांनी केलेल्या माऱ्यात एक मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तालिबानने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने आरोप केला आहे की, 'फितना अल खवारिज' (TTP) चे दहशतवादी अफगाण भूमीचा वापर करून पाकिस्तानात दहशत पसरवत आहेत आणि वारंवार ताकीद देऊनही तालिबान त्यांच्यावर कारवाई करत नाहीये.

दहशतवादाचा 'भस्मासुर' उलटला?

जगाला दहशतवादाचे धडे देणारा आणि 'चांगले दहशतवादी व वाईट दहशतवादी' अशी दुटप्पी भूमिका घेणारा पाकिस्तान आज स्वतःच पेरलेल्या काट्यांवर चालत आहे. ज्या दहशतवादी संघटनांना एकेकाळी पाकिस्तानने खतपाणी घातले, त्याच आता पाकिस्तानसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. या एअरस्ट्राइकमुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून आशियातील भू-राजकीय अस्थिरता वाढण्याची चिन्हे आहेत.

ताजे अपडेट्स (Latest Pointers)

  • तालिबानची लष्करी जमवाजमव : या हल्ल्यानंतर अफगाण-पाकिस्तान सीमेवर (ड्युरंड लाईन) तालिबानने आपले जड तोफखाना आणि लष्करी तुकड्या तैनात करण्यास सुरुवात केली आहे.
  • मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश: अफगाण आरोग्य मंत्रालयानुसार, मृतांमध्ये १२ महिला आणि मुलांचा समावेश असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
  • पाकिस्तानचा हाय-अलर्ट: एअरस्ट्राइकनंतर टीटीपीकडून पलटवार होण्याची शक्यता असल्याने पेशावर आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानने हाय-अलर्ट जारी केला आहे.
  • आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया: भारतासह शेजारील देश या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
  • मदरसा पूर्णतः उद्ध्वस्त: बरमल जिल्ह्यातील ज्या मदरशावर हल्ला झाला, तिथे शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू असून मलब्याखाली अनेक लोक दबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+