Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानवर तालिबानचा हल्ला! 'एवढे' सैनिक ठार; पाकड्यांच्या अनेक चौक्या अफगाणिस्तानच्या ताब्यात

Pakistan afghanistan border clashes : पाकिस्तानवर तालिबानने मोठा हल्ला केला असून यात पाकिस्तानी सैन्यांची मोठी प्राणहाणी झाली आहे. या हल्ल्यानंतर पाकच्या अनेक चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा अफगणिस्तानने केला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला हे प्रत्युत्ततर दिल्याचे तालिबानने म्हटले आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील खैबर-पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील अनेक ठिकाणी झालेल्या गोळीबारानंतर पाकिस्तानी सैन्य आणि अफगाण सैन्यात हिंसक चकमकी सुरू झाल्याची माहिती पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'च्या हवाल्यानुसार एनआयने दिली आहे.

pakistan afghanistan border clashes

photo -ANI

शनिवारी रात्री उशिरा तालिबानी सैनिकांनी अनेक पाकिस्तानी सीमा चौक्यांवर गोळीबार केल्यानंतर ही हिंसक चकमक सुरू झाली. याला पाकिस्तानी सैन्याने अनेक अफगाण सीमा चौक्यांना प्रभावीपणे लक्ष्य केले होते. यामध्ये अनेक अफगाण चौक्या आणि दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर तालिबानने पाकवर हल्ला केला.

मीडिया रिपोर्टनुसार, खैबर-पख्तुनख्वामधील अंगूर अड्डा, बाजौर, कुर्रम, दिर, चित्राल आणि बलुचिस्तानमधील बारामचा यासह अनेक प्रमुख चौक्यांवर गोळीबार झाला. हा गोळीबार प्रामुख्याने बंदी घालण्यात आलेल्या 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (टीटीपी) च्या 'ख्वारिज' नावाच्या गटाला पाकिस्तानी हद्दीत बेकायदेशीर प्रवेश मिळवून देण्यासाठी करण्यात आला होता.

तालिबानचे जोरदार प्रत्युत्तर अन् आरोप

दुसरीकडे, तालिबानच्या सीमा दलांनी म्हटले आहे की, या आठवड्याच्या सुरुवातीला काबुलवर पाकिस्तानी सैन्याने हवाई हल्ले केल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून ही चकमक सुरू झाली. अफगाण सैन्याच्या निवेदनानुसार, "पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून," पूर्वेकडील तालिबान सीमा दल "विविध सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर जोरदार हल्ला केला आहे."

कुनार, नांगरहार, पक्तिका, खोस्त आणि हेलमंड प्रांतातील तालिबान अधिकाऱ्यांनी या चकमकींना दुजोरा दिला आहे. एबीपी माझाने टोलो न्यूजच्या हवाल्यानुसार वृत्त दिले असून या वृत्तात तालिबानने दावा केला की, हल्ल्यात डझनभर पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

अमेरिकेच्या माजी राजदूतांची चिंता

शुक्रवारी, अमेरिकेचे माजी राजदूत झल्मे खलीलझाद यांनी पाकिस्तानने काबुलमध्ये केलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी याला "मोठी वाढ" असे संबोधले, ज्यामुळे धोकादायक धोके निर्माण होतात. त्यांनी लष्करी वाढ हा उपाय नसल्याचे सांगत इस्लामाबाद आणि काबुलमध्ये संवाद साधण्याचे आवाहन केले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+