पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम देश भारतासोबत; पाकिस्तानच्या मात्र उलट्याच बोंबा, वाचा कोण काय म्हणाले...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. पर्यटक व स्थानिक रहिवाशांसह २८ जणांना त्यात आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्याने संपूर्ण भारत हादरला. या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे या घटनेवर प्रतिक्रिया देणाऱ्या प्रमुख जागतिक नेत्यांमध्ये होते. चीन आणि युक्रेननेही शोक व्यक्त केला आहे. याशिवाय अनेक मुस्लिम देशांनीही या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे.

सौदीच्या प्रिन्सने केला निषेध
सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी ठार झालेल्या निष्पाप पर्यटकांबद्दल शोक व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या सर्व शक्तीनिशी लढण्याचा निर्धार केला. भारताने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी आणि सौदी क्राउन प्रिन्स यांच्या भेटीदरम्यान ही चर्चा झाली.
युएईनेही केला निषेध
आखाती देश असलेल्या संयुक्त अरब अमिरातीने या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त अरब अमिराती निषेध करते. ज्यामध्ये डझनभर निष्पाप लोक मारले गेले आणि जखमी झाले.'
इराणनेही काढले प्रसिद्धी पत्रक
इराणनेही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. इराणी दूतावासाच्या x हँडलने लिहिले की, 'नवी दिल्लीतील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचा दूतावास जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो, ज्यामध्ये मोठ्या संख्येने निष्पाप लोक मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले.' आम्ही भारत सरकार आणि भारतातील जनतेप्रती, विशेषतः या हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
पाकिस्तान काय म्हणतं?
भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त राहिलेले अब्दुल बासित यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, "भारताकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कारवाईला हाणून पाडण्यासाठी पाकिस्तान सर्व प्रकारे सज्ज आहे, या गोष्टीबद्दल मी निर्धास्त आहे. यावेळेस पाकिस्तान सडेतोड उत्तर देईल, याबद्दल मला कोणतीही शंका नाही."












Click it and Unblock the Notifications