ओमान जवळ समुद्रात बुडाले जहाज, 13 भारतीयांसह 16 क्रू सदस्यांचा शोध सुरू

ओमान जवळ एक तेल वाहू जहाज बुडाले असून त्यामध्ये 13 भारतीयांसह जहाजावरील सोळा क्रू सदस्य बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या सर्वांचा शोध सुरवासून हे जहाज यमन शहर कडून एडनच्या दिशेने जात होते.

Oil Tanker

प्रेस्टीन फाल्कन असे बुडालेल्या जहाजाचे नाव आहे. जहाजावरील इतर कर्मचारी हे श्रीलंकेचे रहिवासी होते. प्रेस्टीन पालकर हे जहाज बुडाल्याची माहिती सोमवारी मिळाली होती मात्र ते जहाज स्थिर आहे की नाही किंवा तेलाची गळती झाली आहे की नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नव्हते. त्यानंतर सागरी सुरक्षा केंद्राने( एमसीसी ) मंगळवारी म्हणजे जहाज बुडाल्यानंतर एक दिवसानंतर याची माहिती दिली आहे. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू केले असून सध्या तरी या जहाजातील तेल हे समुद्रावर पसरले असल्याची माहिती नाही.

तेल समुद्रात मिसळले तर प्रदूषणाचा धोका

जर हे तेल समुद्रात मिसळले असेल तर मोठा प्रदूषणाचा धोका देखील व्यक्त केला जात आहे. तेल वाहू जहाज पाण्यात बुडाले असून ते पलटी झाले होते. ते जहाज पाण्यात पुन्हा स्थिर झाले की नाही? जहाज बुडाल्यानंतर समुद्रात त्यातून तेल गळती झाली आहे की नाही? याची माहिती अद्याप तरी मिळालेली नाही. एलएसइजी कडील शिपिंगच्या माहितीनुसार या जहाजाची बांधणी ही 2007 मध्ये करण्यात आली होती. हे जहाज 117 मीटर लांबीचे असून त्याच प्रामुख्याने कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते,हे जहाज टँकर प्रकारातील जहाज आहे.

25 नॉटीकल मेल येथे बुडाले जहाज

सागरी सुरक्षा केंद्राने कोमोरोस ध्वजांकित तेल टँकर रास मद्रासच्या दक्षिण पूर्वेस 25 नॉटिकल मेल येथे बुडाल्याचे सांगितले आहे. या जहाजाचा शोध देखील घेतला जात आहे. कॉमनच्या दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर स्थित दुक्म बंदर, देशातील प्रमुख तेल आणि वायु खान प्रकल्पासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. राज्यातील सर्वात मोठा सिंगर इकॉनोमिक प्रकल्प,डूकमच्या विशाल औद्योगिक क्षेत्राचा एक प्रमुख तेल शुद्धीकरण कारखाना देखील आहे.ही माहिती दमानी सेंटरच्या सोशल प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केली आहे. बुडालेल्या जहाज आणि बेपत्ता नागरिकांचा देखील शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+