नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी खरी ठरली! पोपच्या मृत्यूनंतर आपत्ती येणार आहे का?
रोमन कॅथोलिक ख्रिश्चन चर्चचे सर्वोच्च धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. सकाळी 7:35 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हॅटिकन कॅमरलेंगो कार्डिनल केविन फॅरेल यांनी त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करताना म्हटले आहे की, "आज सकाळी रोमचे बिशप फ्रान्सिस त्यांच्या स्वर्गीय घरी परतले."
266 वे पोप म्हणून काम करणारे पोप फ्रान्सिस हे व्हॅटिकन सिटीचे प्रमुख देखील होते. त्यांचे जन्माचे नाव जॉर्ज मारियो बर्गोलियो होते आणि 13 मार्च 2013 रोजी ते पोप म्हणून निवडले गेले. ते इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन आणि पहिले जेसुइट पोप होते, ज्यांनी करुणा, समानता आणि पर्यावरण संरक्षणाच्या त्यांच्या संदेशासाठी जगभरात मान्यता मिळवली.

भविष्यवाणी चर्चेत का आली?
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर भविष्यवाणीसाठी प्रसिध्द असणारे नोस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल्या आहेत. आज त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक 'लेस प्रोफेसीज' मध्ये केलेल्या अनेक भविष्यवाण्यांपैकी एक खरी ठरली आहे असे मानले जाते. यापूर्वी, लंडनमधील आग, हिटलरचा उदय, अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला आणि कोविड-19 साथीच्या आजाराबद्दल त्यांनी केलेले भाकीत खरे ठरली आहेत.
नोस्ट्राडेमसने पुस्तकात काय लिहिले आहे?
फ्रान्सचे नोस्ट्राडेमस यांनी एका भविष्यवाणीत लिहिले होते की, "एका खूप वृद्ध पोपच्या मृत्यूनंतर एक तरुण रोमन पोप निवडला जाईल. लोक म्हणतील की, तो त्याचे सिंहासन कमकुवत करत आहे, परंतु तो न थांबता पुढे जात राहील." त्यांनी पुढे म्हटलं आहे की, "पवित्र रोमन चर्चच्या शेवटच्या छळाच्या वेळी 'रोमन पीटर' नावाचा एक माणूस पोप होईल. तो त्याच्या लोकांना अनेक संघर्षांमध्ये घेऊन जाईल. जेव्हा ते सर्व संपेल, तेव्हा सात टेकड्यांच्या शहराचा नाश होईल "
या भविष्यवाणीत "रोमन पीटर" चा उल्लेख केल्याने पुढचा पोप खरोखर रोमचा असेल की ते अनेक आव्हानांना तोंड देणाऱ्या नेत्याला सूचित करणारे प्रतीकात्मक नाव आहे, यावर वाद निर्माण झाला आहे. त्याच वेळी, "सात टेकड्यांच्या शहराचा" उल्लेख रोम आणि व्हॅटिकनमध्ये संभाव्य उलथापालथीचे संकेत देत आहे.
तिसऱ्या महायुद्धाबद्दलही केलं आहे भाकित
नोस्ट्राडेमसने त्यांच्या पुस्तकात तिसऱ्या महायुद्धाबद्दलही भाकीत केले आहे. त्यांनी लिहिले, "एका देशात, लोकांच्या क्रांतीमुळे एक नवीन नेता सत्ता हाती घेईल, दुसऱ्या देशात एक नवीन पोप बसेल आणि चीन चर्चविरुद्ध युद्ध करेल. नवीन धर्म (इस्लाम) इटली आणि फ्रान्सपर्यंत पोहोचेल, चर्चविरुद्ध विनाश करेल आणि नंतर तिसरे महायुद्ध सुरू होईल", असं त्यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications