Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत-पाक युद्ध थांबवण्याचा कांगावा! ..यासाठी डोनाल्ड ट्रम्प टाकत होते डाव! पण दावेदारी धोक्यात?

Nobel Prize 2025 Announcement Starts Today : भारत पाकिस्तान असो की, युक्रेन रशिया अन् गाझा हमास अन् इस्त्रायल युद्ध ते थांबवण्याचे कथित दावे करणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड आता लक्षात आली आहे. भारत पाक संघर्षातील फेक दावे असो की, इस्त्रायल इराण युद्ध थांबवण्यासाठी खरे प्रयत्न हा सर्व आटापीटा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी होता, आता या कामगिरीचा निकाल येत्या १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Nobel Prize 2025 Announcement Starts Today

जगातील सर्वात प्रतिष्ठित अशा नोबेल पुरस्कारांची घोषणा आज, सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ सुरू होत आहे. मात्र, यंदा सर्वांचे लक्ष १० ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या नोबेल शांतता पुरस्कारावर लागून राहिले आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांनी या पुरस्कारासाठी आपली दावेदारी मजबूत करण्याची एकही संधी सोडली नाही. शेवटच्या क्षणी त्यांनी गाझा पीस प्लॅनचा डावही टाकला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार मिळेल का?

नोबेल शांतता पुरस्काराच्या नामनिर्देशनाची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२५ होती, जी ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ११ दिवसांनी संपली होती. त्यामुळे त्यांचे नामांकन वेळेवर झाले आहे की नाही, याबद्दल शंका आहे. तरीही, तज्ज्ञांनी दिलेल्या संकेतांनुसार, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. विशेषतः बेंजामिन नेतन्याहू आणि शहबाज शरीफ यांसारख्या नेत्यांनी त्यांना उशिरा नामित केले होते. या तांत्रिक अडचणींमुळे ट्रम्प यांना पुरस्कार मिळण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकार सांगत आहेत.

पुरस्कारांच्या घोषणेचा सिलसिला आजपासून सुरू

नोबेल पुरस्कारांच्या घोषणेचा सिलसिला आज, सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी फिजियोलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रातील पुरस्काराने सुरू होणार आहे. हा पुरस्कार वैद्यकीय किंवा मानवी आरोग्याच्या क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना दिला जातो. स्वीडनच्या कारोलिंस्का इन्स्टिट्यूटमधून दुपारी ३:०० वाजता (स्थानिक वेळेनुसार) या पुरस्काराची घोषणा केली जाईल. पुरस्कार विजेत्यांना ११ दशलक्ष स्वीडिश क्रोना (सुमारे ९ कोटी रुपये), सोन्याचे पदक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. पुरस्कारांचे वितरण १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे केले जाईल.

नोबेल पुरस्कार २०२५: संपूर्ण वेळापत्रक

क्षेत्र घोषणा कधी?

  • फिजियोलॉजी किंवा मेडिसिन - सोमवार, ६ ऑक्टोबर
  • फिजिक्स (भौतिकशास्त्र) - मंगळवार, ७ ऑक्टोबर
  • लिटरेचर (साहित्य) - गुरुवार, ९ ऑक्टोबर
  • पीस (शांतता) - शुक्रवार, १० ऑक्टोबर
  • इकोनॉमी (अर्थशास्त्र) - सोमवार, १३ ऑक्टोबर
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+