Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण आहे जब्बार? 15 लोक मारले गेले; व्हॅनमध्ये आयएसआयएसचा झेंडा, यूएस आर्मीशी खास कनेक्शन

New Orleans Attack: न्यू ऑर्लिन्सच्या प्रसिद्ध बोर्बन स्ट्रीटवर नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान एक प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये 15 लोक ठार झाले तर 35 हून अधिक जखमी झाले होते. या हल्लेखोराने पिकअप ट्रकने नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांना चिरडले होते. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या गोळीबारात त्याला ठार करण्यात आलं.

एफबीआयने या घटनेला दहशतवादी कृत्य म्हटलं आहे. चला या घटनेशी संबंधित तथ्य आणि हल्लेखोर सविस्तर जाणून घेऊया...

New Orleans attack

कशी घडली घटना ?

पहाटे 3.15 च्या सुमारास बोर्बन स्ट्रीटवर नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांची गर्दी असताना हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर शमसुद्दीन जब्बार (42) याने पांढऱ्या रंगाचा फोर्ड एफ-150 इलेक्ट्रिक पिकअप ट्रक पादचाऱ्यांवर नेला. यानंतर तो वाहनातून बाहेर आला आणि त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल त्याला देखील ठार मारण्यात आलं.

हल्लेखोर कोण होता?

एफबीआयच्या म्हणण्यानुसार शमसुद्दीन जब्बार हा टेक्सासचा रहिवासी होता आणि अमेरिकन लष्कराचा माजी सैनिक होता. त्याने आर्मीमध्ये आयटी तज्ञ म्हणून काम केले आणि नंतर ह्यूस्टनमध्ये रिअल इस्टेट एजंट बनला. वाहनात ISIS चा झेंडा सापडला असून, त्याचा दहशतवादी संघटनांशी संबंध असण्याची शक्यता तपासली जात आहे. जब्बारवर यापूर्वी 2002 मध्ये चोरी आणि 2005 मध्ये अवैध परवाना घेऊन वाहन चालवण्याचे दोन किरकोळ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दुस-या लग्नाचा शेवट 2022 मध्ये घटस्फोटात झाला.

तपासात काय आढळले?

एफबीआयने याकडे दहशतवादी घटना म्हणून पाहिले आणि जब्बारचे आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंध असण्याची शक्यता तपासली जात असल्याचे सांगितले. घटनास्थळावरून पोलिसांना दोन देशी बॉम्ब सापडले. जब्बारच्या ऑनलाइन प्रोफाइल आणि यूट्यूब व्हिडिओवरून असे दिसून येते की, तो रिअल इस्टेटमध्ये काम करत होता आणि आर्थिक समस्यांशी झुंजत होता.

सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली जात आहेत?

या हल्ल्यानंतर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जब्बारचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत याची एफबीआय कसून चौकशी करत आहे. हा हल्ला म्हणजे अमेरिकेतील वाढत्या दहशतवादी घटनांचा आणखी एक इशारा आहे. सुरक्षा यंत्रणा हे गांभीर्याने घेत असून सर्व शक्यता तपासत आहेत. जनतेला सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच काही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास पोलिसांना कळवावे असं सांगण्यात आलं आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+