Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काऊंडडाऊन सुरु! भारताचे सुपुत्र शुभांशू शुक्ला आज अंतराळात झेप घेणार! कोण आहेत ते? जाणून घ्या मिशन

Nasa axiom mission 4 launch today Shubhanshu Shukla will go to space : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज अंतराळात झेपावणार आहेत. हा भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. नासा अ‍ॅक्सिओम मिशन 4 यानअंतर्गत ही मोहिम ते साकारणार आहेत. अ‍ॅक्सिओम 4 मोहिमेचे प्रक्षेपण आज होणार आहे. यासंदर्भात नासाने 24 जून, मंगळवारी घोषणा केलेली आहे.

स्पेसएक्सने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, अ‍ॅक्सिओम स्पेसच्या एक्स-4 मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी सर्व यंत्रणा ठिक-ठाक दिसत आहेत. त्यामुळे काही दिवसांपुर्वी थांबवलेली मोहिम आज सुरु होणार आहे.

Nasa axiom mission 4 launch today

शुभांशु शुक्ला कधी घेणार अंतराळात झेप

अ‍ॅक्स-4 मिशन आज भारतीय वेळेनुसार दुपारी 12:01 वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होईल. आज शुभांशू शुक्ला आज इतिहास रचणार असून शुभांशू शुक्ला आज अंतराळात उड्डाण करताच, ते आयएसएसला भेट देणारे पहिले भारतीय आणि राकेश शर्मा यांच्या 1984 च्या मोहिमेनंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय बनतील.

अवकाश संशोधनाचा मार्ग मोकळा..

शुभांशु शुक्लाचा सहभाग जागतिक अंतराळ संशोधनातील भारताच्या वाढत्या भूमिकेचे प्रतिबिंबित करतो, राकेश शर्माच्या पावलावर पाऊल ठेवत, ज्यांना 1984 मध्ये अंतराळात पहिले भारतीय बनण्याचा मान मिळाला आहे. NASA, Axiom Space आणि ISRO यांच्यातील सहकार्यामुळे खाजगी अंतराळवीरांना कमी पृथ्वीच्या कक्षेत जाण्यासाठी वाढीव प्रवेश दर्शवतो, ज्यामुळे अवकाश संशोधनाचा मार्ग मोकळा होतो.

कोण आहे शुभांशु शुक्ला?

  • शुभांशु शुक्ला हे भारतीय वायूदलात कॅप्टन आहेत, ते या मोहिमेत स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टवर मिशन पायलटच्या रुपात काम करणार आहेत.
  • 39 वर्षीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे रहिवासी आहेत.
  • 1985 साली जन्मलेले शुभांशु शुक्ला हे 18 वर्षे भारतीय हवाई दलात कॅप्टन या पदावर आहेत.
  • शुभांशु शुक्ला यांनी प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतले आहे.
  • शुभांशु शुक्ला यांना 2006 मध्ये भारतीय हवाई दलात कमिशन मिळाले.
  • शुभांशु शुक्ला हे फायटर कॉम्बॅट लीडर आणि 2000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असलेले चाचणी वैमानिक आहेत.
  • शुभांशु शुक्ला यांना सुखोई-30 MKI, MiG-21S, MiG-29S, Jaguar, Hawks Dorniers आणि An-32 सारखी लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव आहे.

..म्हणून सैन्यात झाले भरती

शुभांशु शुक्ला यांच्या कुटुंबीयांच्या मते, कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांच्या शौर्य आणि बलिदानाच्या शौर्यगाथा जाणून घेतल्यानंतर शुभांशु शुक्ला यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले तेव्हा शुभांशु शुक्ला 14 वर्षांचे होते. तेव्हापासून त्यांना सैन्यात भरती होण्याची इच्छा होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+