पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी हल्ला, 16 जवानांच्या चिंधड्या, कसा घडला थरार
Pakistan News : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 16 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर 8 सैनिक जखमी झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा लिटा सार भागातील एका सुरक्षा चौकीवर हा अटॅक करण्यात आला.
या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तानमधील माकिनमधील लिटा सार भागात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले तर 8 जखमी झाले.

पाकिस्तानमधील सुरक्षा चौकीवर हल्ला
अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. या हल्ल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने खोरासान डायरीशी बोलताना सांगितले की, लिटा सार भागातील सुरक्षा चौकीवर रात्री उशिरा हा हल्ला झाला. आम्ही तुम्हाला सांगतो की खैबर पख्तुनख्वा असा एक भाग आहे जिथे दररोज दहशतवादी हल्ले केले जात आहेतत.
खैबर पख्तुनख्वामध्ये परिस्थिती बिघडली
मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तुनख्वान हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे. बातमीनुसार, येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या हल्ल्यांसाठी पाकिस्तान तेहरीक-ए-तालिबान (टीटीपी) ला जबाबदार धरत आहे. याशिवाय, अफगाण तालिबान सरकार अफगाणिस्तानमध्ये टीटीपी लढवय्यांना आश्रय देत असल्याचा आरोपही केला आहे.












Click it and Unblock the Notifications