Lebanon Pager Blast : लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या लढाऊ पेजरचा स्फोट, 8 ठार, 3 हजारांवर जखमी
Lebanon Pager Blast: लेबनॉनमध्ये संवाद साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेजरमध्ये स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली. या हृदयद्रावक घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर तब्बल 2750 लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये इराणचे राजदूत मोजतबा अमानी यांचाही समावेश आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे स्फोट बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगर दहियाह येथे झाले. लेबनॉनच्या मध्य बेका व्हॅलीमधील अली अल-नहरी आणि रियाक या शहरांमध्ये घडली. वृत्तसंस्था एनएनएने सांगितले की, "हॅक केलेले" पेजर उपकरणांचा स्फोट झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले. मंगळवारी ज्या ठिकाणी स्फोट झाले ती ठिकाणे हिजबुल्लाचा गड मानला जातो.

स्फोटामुळे पेजर बंद करण्याचे आवाहन
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना स्फोटाबद्दल त्यांचे पेजर बंद करण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाने रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक हल्ल्यामुळे लेबनॉनमध्ये कैक लोक जखमी झाले आहेत, स्पुतनिकच्या वार्ताहरांनी दिलेल्या वृत्तानुसार अल जझीराने हिजबुल्लाहच्या एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन नेटवर्कचे हॅकिंग आणि त्याचवेळी क्षीण केल्याचा अहवाल दिला आहे.
Dozens of people have been injured in Lebanon as a result of an electronic attack, Sputnik's correspondent reports
— Sputnik (@SputnikInt) September 17, 2024
Al Jazeera reports hacking and simultaneous undermining of Hezbollah's encrypted communications network pic.twitter.com/IgJBTBhM78
हिजबुल्लाहवर अमेरिकेसह युरोपीय देशांनी बंदी घातली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गाझावर इस्रायलने हल्ले सुरू केल्यापासून इराण समर्थित हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात सीमापार चकमकी सुरू आहेत. सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले वाढले आहेत.
8 ठार, 2750 जखमी
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. अपघातानंतर अपडेट देताना मंत्रालयाने सांगितले की पेजर स्फोटात 8 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2,750 लोक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेरूतच्या रस्त्यावर रुग्णवाहिका
या स्फोटांनंतर अनेक रुग्णवाहिका बेरूतच्या दक्षिण भागातील रुग्णालयांकडे धावताना दिसल्या. बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरे, दक्षिण लेबनॉन आणि पूर्वेकडील बेका व्हॅलीमध्ये हिजबुल्लाच्या गडामध्ये त्यांच्या पेजरचा स्फोट झाल्याने शेकडो हिजबुल्लाह सदस्य जखमी झाले. या घटनेत इराणच्या सरकारी माध्यमांनी लेबनॉनमधील राजदूतही जखमी झाल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यासाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार धरले आहे. एएफपीच्या अहवालानुसार, टायर आणि सिडॉन शहरांदरम्यान डझनभर रुग्णवाहिका दिसल्या.
-
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद -
ऑनलाइन फसवणुकीला बसणार लगाम! मेटाची 'अँटी-स्कॅम' ढाल; WhatsApp, FB व मेसेंजर आता सुरक्षित! -
LPG cylinder shortage : भारतात एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा! सरकारचे मोठे आदेश, कुठे काय स्थिती जाणून











Click it and Unblock the Notifications