कमला हॅरीस यांची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित, 'यांनी' ही दिला पाठिंबा..

Kamala Harris News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना बायडेन यांनी हा निर्णय घेतल्याने अमेरिकेतील निवडणुकीचे चित्रच बदलले आहे. बायडेन यांच्या पाठिंब्यामुळे कमला हॅरिस या डेमोक्रेटिक पक्षाच्या सर्वांत प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

2020 मध्ये पक्षाचे उमेदवार म्हणून माझा पहिला निर्णय म्हणजे कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड करण्याचा होता आणि हा मी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता," असे बायडेन यांनी 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये लिहिले. ते पुढे म्हणाले, "या वर्षी आमच्या पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला यांना माझा पूर्ण पाठिंबा आणि समर्थन देऊ इच्छितो." त्यावर हॅरिस यांनी प्रतिक्रिया देत पोस्ट केले की, त्यांचा हेतू हे नामांकन मिळवणे आणि निवडणूक जिंकणे आहे. डेमोक्रॅटिक पक्ष हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार मानून तयारीला लागला आहे.

kamala harris

हॅरिस यांच्यासमोर मोठी आणि महत्त्वाची आव्हाने आहेत. प्रचारासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना, त्यांना पक्ष आणि देणगीदारांना त्वरित एकत्र करणे आवश्यक आहे. अमेरिकेत हॅरिस यांना समर्थन देणार्‍यांची संख्या बायडेन यांच्या तुलनेत किंचित बरी आहे. 'फाइव्ह थर्टी एट'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार 38.6 टक्के अमेरिकन नागरिक हॅरिस यांना समर्थन देतात; तर 50.4 टक्के नागरिक नापसंती दर्शवितात. बायडेन यांना 38.5 टक्के नागरिक समर्थन देतात; तर 56.2 टक्के नागरिकांची त्यांना नापसंती आहे.

आतापर्यंत निवडणूक प्रचारात डोनाल्ड ट्रम्प थेट जो बायडेन यांच्या व्यक्तिमत्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. बायडेन यांच्या वयावरून डेमोक्रॅट नेतेही पक्षात बिडेन यांच्याबाबत जनमताची मागणी करत होते. अशा स्थितीत कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या उमेदवार बनवल्यास डेमोक्रॅट पक्षाची संपूर्ण ताकद ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक प्रचारात वापरली जाईल. यामुळे सध्या ट्रम्प यांच्या बाजूने होणारी एकतर्फी लढत रोचक होईल.

अमेरिकन राजकारणात देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. कमला हॅरिस या जो बिडेन यांच्यानंतर पक्षाच्या दुसऱ्या सर्वात अनुभवी नेत्या आहेत. अमेरिकेच्या बहुसंख्य लोकसंख्येला वाटते की ती आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आपली जबाबदारी जोरदारपणे पार पाडू शकतात. इस्रायल किंवा युक्रेनबाबत कमला यांची भूमिका बायडेन यांच्यापेक्षा अधिक स्पष्ट आहे. ती ज्यू देश इस्रायलची कट्टर समर्थक आहे. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर स्पष्ट विचारसरणीमुळे इस्रायलचे कट्टर समर्थक असलेल्या अमेरिकन लोकांची मते आकर्षित करू शकतात

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+