Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांनी घेतली बायडेन यांची भेट; सत्ता हस्तांतरणासंदर्भात मोठी अपडेट

Joe Biden Meets President Elect Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन मावळते अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली आहे. तर जो बायडेन यांनी रिपब्लिकन नेत्यास सुरक्षित आणि अतिशय शांततेते सत्ता हस्तातंरण करण्याची ग्वाही दिली आहे.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नवनिर्वाचिन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले. दरम्यान, सत्ता सोपविण्याच्या दृष्टीने आता अमेरिकेत पाऊले उचलली जात आहेत. त्यादृष्टीने दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान, बायडेन म्हणाले की, सत्ता सोपविण्यासाठी ही वेळ संपूर्ण देशासाठी महत्त्वाची असणार आहे. त्यावर ट्रम्प म्हणाले की, राजकारणात या गोष्टी घडत असतात. पण हे हस्तांतरण सुरळीत होण्यासाठी योगदान दिले जाईल. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद करणे टाळले.

Us Presidential Election 2024

दोन्ही नेत्यांची भेट का महत्त्वाची?

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन सोबत बुधवारी झालेली भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्याचे कारण देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे. मुळात 2020 साली झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये बायडेन यांनी ट्रम्प यांचा दारुण पराभव केला होता. तर 2020 मध्ये ट्रम्प यांनी बायडेन यांना सत्ता हस्तांतरण सहजासहजी होऊ दिले नव्हते.

काही परंपरा त्या वेळी पाळल्या नव्हत्या. त्याच वेळी, त्यांनी तत्कालीन अध्यक्ष-निर्वाचित जो बायडेन यांना व्हाईट हाऊसला भेट देण्यास आमंत्रण दिले नव्हते. तर बायडेन यांच्या शपविधी समारंभालाही ते उपस्थित नव्हते. पण यावेळी ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आणि त्यांनी या परंपरांचे पालन करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+