इस्त्रायलचा मोठा हल्ला, हिजबुल्लाहचा नवा चीफ हाशिम सफीद्दीन ठार

इस्त्रायलने काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई करत हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरुल्लाह यांची हत्या केली होती. त्यानंतर या दोन्ही देशात प्रचंड तणाव वाढला. इस्त्रायलने आपल्या कारवाया सध्याही सुरु ठेवल्या असून, एका अहवालानुसार गुरुवारी इस्त्रायलने केलेल्या मोठ्या हल्यात बेरुतच्या दाहेह उपनगरात हाशेम सफीद्दीनही ठार झाला आहे. इस्त्रायलने गुरुवारी मध्यरात्री बेरुतवर मोठे हवाई हल्ले केले. त्यावेळी सफीद्दीन भुमिगत बंकरमध्ये हिजबुल्लाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक करत होता, असे सांगितले जात आहे.

Hashim Safiddin

सफीद्दीन तीन प्रमुख नेत्यांपैकी एक

आयडीएफने बेरुतसह दक्षिणी लेबनाँनमधील भागांवर हल्ले केले. बेरुतमध्ये अनेक ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. हाशिम सफीद्दीनला 2017 मध्ये अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. सफीद्दीन सध्या हिजबुल्लाच्या राजकीय घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावत होता. तसेच तो दहशतवादी जिहाद परिषदेचा सदस्यही होता. नसराल्लाह आणि नईम कासिम यांच्यासह हिजबुल्लाच्या प्रमुख तीन नेत्यांमध्ये सफीद्दीन ओळखला जात होता.

गाझावरही सुरु आहेत हल्ले

इस्त्रायल लेबनाँन व इराणशी संघर्ष करत असतानाच गाझावरही हल्ले करत आहे. इस्त्रायल डिफेन्स फोर्स अर्थात आयडीएफने गुरुवारी पॅलेस्टिनी संघटना हमासच्या तीन प्रमुख नेत्यांना ठार केल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात गाझा सरकारचा प्रमुख रावी मश्ताहा, हमास कमांडर समेह सिराज आणि समेह औदेह हे तिघे ठार झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हे तिघेही तीन महिन्यांपूर्वी केलेल्या हल्यातच ठार झाले असल्याचे इस्त्रायलने आत्ता जाहीर केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+