जगातील सर्वात डेंजर खुफिया एजन्सी कोणती? ज्या एजन्सीने टुथपेस्टमध्ये विष लावून मारले होते दुश्मन
भारतात पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थांची चर्चा सुरु झाली. भारत या हल्ल्याचा नक्कीच बदला घेईल, असेही सांगितले जात आहे. मात्र जगातली सर्वात खरतनाक गुप्तचर संस्था कोणती? हा प्रश्न अनेकांना पडतो. जेव्हा-जेव्हा जगातील गुप्तचर संस्थांचा विषय निघतो तेव्हा-तेव्हा इस्रायलच्या 'मोसाद' या गुप्तचर संस्थेची चर्चा होते. मोसादला जगातील सर्वोत्तम गुप्तचर संस्थांपैकी एक मानले जाते. ते का? तेच आपण पाहूयात...

इस्त्रायल शत्रूंना सोडत नाही
इस्त्रायल कधीही आपल्या शत्रूंना माफ करत नाही, असं म्हटलं जातं. त्याचे जिवंत उदाहरण दिले जाते १९७२ च्या म्यूनिक ऑलंपिकमधील दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात इस्त्रायलच्या ११ खेळाडूंचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्त्रायलने जवळपास सात वर्षे एक विशेष ऑपरेशन चालवत या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व शत्रूंचा नाश केला. त्यातील एका दहशतवाद्याला तर थेट टुथपेस्टमध्ये विष देऊन मारले होते. विशेष म्हणजे या हत्येची कित्येक वर्षे तपासणी झाली, पण कुणाच्याच हाती काही लागले नाही.
पॅलिस्टीन कमांडरच्या हत्येचे गुढ
१९७८ मध्ये पॅलेस्टिनी कमांडर हद्दादला मोसादने मारले. तेव्हा इस्रायली एजन्सीच्या शत्रूंना संपवण्याच्या अपारंपरिक पद्धती प्रकाशात आल्या. हद्दादला मोसादच्या एजंट्सनी विषारी टूथपेस्ट वापरून मारले. पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनचे प्रमुख हद्दाद हे त्यावेळी इस्रायलच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक मानले जात होते. आजारी पडून हद्दादला मृत्यू आला. मात्र त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्याच्यावर हळूहळू विषप्रयोग केल्याचे समोर आले. मोसादच्या एजंटांनी टूथपेस्टमध्ये विष लावून हद्दादला संपवले असे काहींचे म्हणणे होते. तर काहींच्या मते त्याला चाँकलेटमधून विष देण्यात आले होते.
हद्दादने काय केले होते?
१९७६ मध्ये एअर फ्रान्सच्या विमानाच्या अपहरणात हद्दादचा सहभाग होता. अपहरणकर्त्यांनी विमान लिबिया आणि नंतर युगांडाला नेले. इस्रायलने ऑपरेशन थंडरबोल्टने प्रत्युत्तर दिले. ही कारवाई यशस्वी झाली पण त्यात लेफ्टनंट कर्नल नेतान्याहू यांचा मृत्यू झाला. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद या विमान अपहरणाचा आणि त्याच्या लेफ्टनंटचा बदला घेऊ इच्छित होती आणि हद्दादला संपवू इच्छित होती.
हद्दादला कसे मारले?
हद्दादला मारण्याचे काम मोसादने 'एजंट सॅडनेस' नावाच्या एजंटला सोपवले. ज्याला हद्दादच्या घर आणि कार्यालयात प्रवेश होता. जानेवारी १९७८ मध्ये एजंट सॅडनेसने हद्दादच्या नियमित टूथपेस्टऐवजी विशेष तयार केलेल्या विषारी पेस्टचा वापर केला. त्याच्या वापरामुळे हद्दाद आजारी पडला. काही दिवसांतच हद्दाद बगदादमध्ये गंभीर आजारी पडला. हद्दादला पोटात पेटके येणे, भूक न लागणे आणि जलद वजन कमी होणे अशा समस्या होत्या. जेव्हा इराकी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले तेव्हा त्यांना आढळले की त्याला विषबाधा करण्यात आली होती. उपचारासाठी हद्दादला बर्लिनला नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या केल्यावर त्याला हळूहळू विष देण्यात आल्याचे समोर आले. जानेवारीमध्ये हद्दादला विषबाधा झाली आणि अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्यानंतर २९ मार्च १९७८ रोजी त्याचे निधन झाले.
मोसादची सर्वत्र चर्चा
शवविच्छेदनात असे आढळून आले की वाडी हद्दाद यांचा मृत्यू मेंदूतील रक्तस्त्राव आणि पॅनमायलोपॅथीमुळे झालेल्या न्यूमोनियामुळे झाला. हद्दादच्या हत्येचे सत्य समोर येण्यासाठी जवळजवळ तीन दशके लागली. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद ही जगातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक मानली जाते. मोसादचे वार्षिक बजेट ३ अब्ज डॉलर्स आहे आणि ते सुमारे ७,००० लोकांना रोजगार देते. मोसादच्या अंतर्गत रचनेबद्दलची जास्त माहिती एजन्सी सार्वजनिक करत नाही.












Click it and Unblock the Notifications