इस्रायली कॅबिनेटची हमाससोबतच्या युद्धबंदीला मंजुरी; काय झाला करार, युद्धविरामाचे 3 टप्पे कसे असणार?
Israel Approves Ceasefire With Hamas : इस्रायलच्या कॅबिनेटने हमाससोबतच्या युद्धविराम कराराला शनिवारी दि.१८ जानेवारी मंजुरी दिली आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, हा युद्धविराम रविवारपासून म्हणजेच उद्यापासून लागू होईल.
इस्रायली मंत्र्यांनी कराराच्या बाजूने 24-8 मते दिली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने शनिवारी सकाळी एक निवेदन जारी केले. तसेच सरकारने ओलीस परत करण्याच्या योजनेला मान्यता देखील दिली आहे.
तीन टप्प्यात पूर्ण होईल करार
मिळालेल्या माहितीनुसार, युद्धविरामाचा हा करार 3 टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात हमास इस्रायलमधून अपहरण केलेल्या ३३ ओलिसांची सुटका करणार आहे. तसेच, इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून 700 मीटर मागे हटणार आहे.
इस्रायलमधील न्याय मंत्रालयाने 95 पॅलेस्टिनी कैद्यांची यादीही जारी केली असून त्यांना रविवारी सोडण्यात येणार आहे. यामध्ये 69 महिला, 16 पुरुष आणि 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

(फोटो सोर्स- टाईम्स ऑफ इस्रायल)
इस्त्रायल किती पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार?
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल 700 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे. या लोकांच्या नावांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत समाविष्ट असलेले अनेक लोक हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, त्यात हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद सदस्यांचा समावेश आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलमध्ये घुसून 1200 लोकांची हत्या केली आणि 251 लोकांना ओलीस ठेवले. त्यानंतर काही तासांनी इस्रायली सैन्याने गाझावर हल्ला केला.
युद्धविराम कराराचे तीन टप्पे कसे असणार?
पहिला टप्पा कधीपासून
गाझामध्ये 19 जानेवारी ते 1 मार्चपर्यंत संपूर्ण युद्धविराम असेल. हमास 33 इस्रायली ओलीस सोडणार आहे. इस्रायल आपल्या एका ओलिसाच्या बदल्यात दररोज 33 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. प्रत्येक इस्रायली महिला सैनिकामागे 50 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल.
दुसरा टप्पा कधी सुरू राहणार
पहिल्या टप्प्याच्या १६व्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीपर्यंत सर्व काही सुरळीत राहिल्यास दुसऱ्या टप्प्याच्या योजनेवर चर्चा सुरू होईल. या काळात कोणताही हल्ला केला जाणार नाही. जिवंत राहिलेल्या ओलिसांची सुटका केली जाईल.
इस्रायल 1,000 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल, ज्यात 15 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या सुमारे 190 कैद्यांचा समावेश आहे.
तिसरा टप्पा केव्हापासून सुरु होईल?
या कराराच्या शेवटच्या टप्प्यात गाझाचे पुनर्वसन केले जाईल. यासाठी ३ ते ५ वर्षे लागतील. हमासने मारलेल्या ओलीसांचे मृतदेहही इस्रायलकडे सोपवले जाणार आहेत.












Click it and Unblock the Notifications