Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इस्रायलच्या एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार; जाणून घ्या- इराण कुठे-कुठे घाव घालू शकतो?

Israel-Iran War : इस्रायलने राजधानी तेहरानसह अनेक इराण शहरांवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ला केला आहे. इस्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे की, इराणच्या लष्करी तळांवर बॉम्बफेक केल्यानंतर त्यांची लढाऊ विमाने परत आली आहेत. म्हणजेच इस्रायलचा बदला पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता इराण 1 हजार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही वृत्तानुसार, इराणने इस्लामिक रिपब्लिकवर नियोजित इस्त्रायली प्रत्युतरादाखल हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरी घातपात आणि मोठ्या प्रमाणात विनाश झाल्यास इस्रायलवर 1,000 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह हल्ला करण्याची धमकी दिलेली आहे.

Israel-Iran War

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराण 1 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्त्रायलने हल्ला केल्यास कशा पद्धतीने कारवाई करायची याचा प्लॅन आखत आहे. या वृत्तानुसार, चार इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अयातुल्ला खमेनी यांनी लष्कराला तयारी करण्यास सांगितले आहे, संभाव्य परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच, इस्रायलने हल्ला केल्यास त्याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यायचे याची योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, इराणच्या हल्ल्यात इस्रायलचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्याचवेळी, हिजबुल्लाह नेता हसन नसराल्लाहसह अनेक इराणी प्रॉक्सी नेत्यांच्या हत्येनंतर इराण आणि इस्रायलमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे.

इराण कुठे हल्ला करू शकतो?

एक हजार क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याव्यतिरिक्त, इराण गल्फ शिपिंगला देखील लक्ष्य करू शकतो आणि तेहरानच्या प्रादेशिक प्रॉक्सी इस्रायलच्या विरूद्ध हल्ल्यांची संख्या वाढवू शकतो आणि शक्यतो प्रादेशिक ऊर्जा सुविधांना लक्ष्य करू शकतो. ज्यामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडतात.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर इस्रायलने आपले हल्ले लष्करी सुविधांपर्यंत मर्यादित केले तर कमीत कमी नुकसान होऊ शकते, तर दुसरीकडे इराण प्रतिसाद देणार नाही. मात्र, इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती नुकसान झाले आहे, याची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही. परंतु, असे मानले जाते की इस्रायलने मर्यादित हल्ला केला आहे आणि कदाचित त्याचा हेतू जास्त नुकसान करण्याचा नव्हता, त्यामुळे इराण पुन्हा हल्ला करू शकत नाही अशीही शक्यता आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी गेल्या आठवड्यात रशियामध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेत सांगितले की, "इस्रायलचा हल्ला झाल्यास, आमच्या प्रतिसादाचे स्वरूप प्रमाणानुसार मोजले जाईल.

त्याचवेळी, अमेरिकेने इस्रायलमध्ये THAAD क्षेपणास्त्र-विरोधी बॅटरी तैनात केल्या आहेत, ज्यामुळे प्रतिसाद मोठा असू शकतो. इराणवरील नियोजित हल्ल्याचा तपशील अमेरिकेकडून लीक झाल्यानंतर इस्रायलने उत्तर देण्यास उशीर केला होता, असे म्हटले जाते, परंतु आता इस्रायलने हल्ला केला असून इराणच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+