Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हिजबुल्लाहला डबल फटका! हसन नसराल्लाहचा संभाव्य उत्तराधिकारी हाशेम सफीउद्दीन हवाई हल्ल्यात ठार

इराणने मिसाईल डागल्यानंतर इस्त्रायल अधिक आक्रमक होत असून हिजबुल्लाहचा हसन नसराल्लाहचा खात्मा केल्यानंतर आता त्याचा संभाव्य उत्तराधिकारी हाशेम सफीउद्दीन हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. बेरूतमध्ये इस्रायलने हा हवाई हल्ला झाल्याची माहिती आहे. ही घटना इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील वाढत्या तणावाचे द्योतक आहे.

अल हदाथचा दावा

सौदी वृत्त आउटलेट अल हदाथने शनिवारी दावा केला की, हिजबुल्लाचे सरचिटणीस हसन नसराल्लाह यांचे संभाव्य उत्तराधिकारी हाशिम सफीउद्दीन, त्याच्यासह दक्षिण बेरूतमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात सहकारी मारले गेले आहेत. इस्रायलने हाशेम सफीउद्दीनच्या मृत्यूला दुजोरा दिल्याचा दावाही अल हदाथने केला आहे. मात्र, इस्रायलने अद्याप त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. असे वन इंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटलं आहे.

Israel Iran Hezbollah War

इस्रायली माध्यमांनी लेबनीज स्त्रोतांचा हवाला देत वृत्त दिले आहे की इस्रायलने शुक्रवार आणि शनिवारी रात्री बेरूतच्या दहीह उपनगरात हाशेम सफीडाइनला लक्ष्य केले. शुक्रवारी, इस्रायलच्या संरक्षणमंत्रालयाकडून सांगण्यात आले की, यांनी दक्षिणी उपनगरातील हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयाला लक्ष्य केले आहे आणि गटातील वरिष्ठ नेत्यावर झालेल्या हल्ल्यांनंतर झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा घेतला जात आहे.

...लेबनाॅन सोडा

अमेरिकन न्यूज पोर्टल Axios ने तीन इस्रायली अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री बेरूतमधील भूमिगत बंकरमध्ये हाशेम सफीउद्दीनला लक्ष्य करण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅटझ यांनी शनिवारी ट्विटरवर सफीद्दीन आणि नसराल्लाह यांचा फोटो पोस्ट केला आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना "तुमच्या प्रतिनिधींना घेऊन जा आणि लेबनॉन सोडा" असा इशारा दिला.

इस्रायलने 27 सप्टेंबर रोजी हवाई हल्ल्यात हिजबुल्लाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा केला होता. यात महासचिव हसन नसराल्लाह यांचाही समावेश आहे. अयातुल्ला अली खमेनेई यांनी शुक्रवारी प्रार्थनेवेळी तेहरानमधील मोठ्या जनसमुदायाला इराण आणि त्याचे प्रादेशिक सहयोगी मागे हटणार नाहीत, असे सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+