Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

थरारक..! जीव वाचवण्यासाठी पळापळ, परिस्थिती हाताबाहेर चाललीय! इस्त्रायलमधील भारतीयांकडून VIDEO शेअर

Iran Israel War : इस्रायलकडून सध्या त्यांच्या शत्रुंविरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु आहे. त्याचवेळी शत्रूकडून सुद्धा इस्रायलवर हल्ले होत आहेत. मंगळवारी रात्री असाच हल्ला झाला. इराणने इस्रायलवर एकापाठोपाठ एक जवळपास 200 मिसाइल्स डागली. त्यानंतर तिथेच जीव वाचवण्यासाठी एकच पळापळ सुरु झाली.

इस्रायलमध्ये नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने असलेल्या भारतीयांनी सुद्धा हा थरारक अनुभव घेतला. इस्रायलमध्ये राहणारे भारतीय सध्या तणावाखाली आहेत. कारण त्यांना या संघर्षाची झळ बसत आहे.

Iran Israel War VIDEO Share by Indians

भारतीय आहेत प्रचंड तणावाखाली

याआधी कधी अशी भितीदायक स्थिती अनुभवली नव्हती" असं राजेश मेडीचेरला यांनी सांगितलं. ते तेलंगणहून आले आहेत. तेलअवीव मधल्या इमारतीवर मिसाइल पडत असल्याचा व्हिडिओ भारतीय वंशाचे असलेले राजेश यांनी शेअर केलाय. इराणने थेट तेल अवीवपर्यंत मिसाइल हल्ला केल्याने इस्रायलमध्ये वास्तव्याला असलेले भारतीय नोकरदार आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. सध्या इथे असलेले भारतीय सुरक्षित आहेत. पण येणाऱ्या दिवसात तणाव आणखी वाढू शकतो.

"काही दिवसांपूर्वी मित्राच्या घरापासून 100 मीटर अंतरावर बॉम्ब पडला. सीसीटीव्हीमध्ये ते फुटेज आहे. तो बॉम्ब त्याच्या घरावर पडला असता, तर?. मागच्यावर्षी सुरु झालेल्या इस्रायल-हमास युद्धाचा आम्हाला फारसा परिणाम जाणवला नाही. पण यावेळी गोष्ट वेगळी आहे" असं निलब्जा रॉय चौधरी म्हणाल्या. त्या उत्तर इस्रायलमध्ये राहतात. मुळच्या कोलकत्याच्या निलब्जा राँय चौधरी यांनी 'दिवसेंदिवस स्थिती भयावह होत चालली आहे' असं सांगितलं. तेल अवीवमधल्या विद्यापीठात त्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.

पश्चिम बंगालमधील विद्यार्थी जास्त

पश्चिम बंगालमधून अनेक जण शिक्षणासाठी इस्त्रायलमध्ये गेले आहेत. शिक्षण घेऊन ते इस्रायलमध्ये नोकरी करतायत. आता लवकरात लवकर त्यांना घरी परतण्याची ओढ लागली आहे. सध्या इस्रायलमध्ये जाणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाण बंद आहेत. इस्रायलमधून बाहेर निघण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून काय मार्गदर्शक सूचना केल्या जातात, त्याची काल भारतीय प्रतिक्षा करत होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+