Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतीयांनो तेहरान तातडीने सोडा..इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभुमीवर भारत सरकारची महत्वाची सूचना

Iran Israel War Tehran Crisis : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात रोज भर पडत असून आता तेहरानमध्ये सुरु असलेल्या हल्ल्यामुळे तेथे राहणाऱ्या भारतीयांना आता केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय विद्यार्थी तसेच नागरिकांनी इराण-तेहरान तातडीने सोडण्याचा सल्ला दिला आहे. यासंबंधी संपर्क क्रमांक जारी करण्यात आले असून त्यावर आवश्यक ती मदत मिळू शकणार आहे.

इराण आणि इस्त्रायलच्या आकाशात युद्धाचे ढग दाट आहेत. मिसाईलचा दोन्ही देशांकडून होणारा मारा आणि जमीनीवर होणारा हाहाकार यामुळे येथील जीवन संकटात सापडले आहे. त्यामुळे नागरी वस्तीत राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरुन राहण्याची वेळ या काळात आली आहे. अशातच भारतीय नागरीकांच्या सुरक्षिततेची चिंता भारतीय दुतावासाने यापुर्वीच व्यक्त केली. त्यानंतर भारत सरकारने गाईडलाईन्स अर्थात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Iran Israel War Tehran Crisis

Take a Poll

दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे आणि परिस्थिती आणखी वाढण्याच्या धोक्यामुळे अमेरिकन नागरीकांना तेहरानमधून तात्काळ बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता भारत सरकारनेही हेच धोरण अवलंबवले आहे. भारतीय दूतावासाने तेहरानमधील सर्व भारतीयांना, जे स्वतःच्या साधनांचा वापर करून तेहरान सोडू शकतात, त्यांना विलंब न करता शहराबाहेरील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी अद्याप भारतीय दूतावासाशी संपर्क साधलेला नाही त्यांनी त्यांचे स्थान आणि संपर्क तपशील त्वरित शेअर करावेत अशी विनंती करण्यात आली आहे.

वाढत्या संघर्षादरम्यान अमेरिका, चीनच्या सरकारने स्थलांतराच्या सूचना त्यांच्या नागरीकांना दिल्या तर भारतीय दूतावासानेही अशा सुचना देत हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. ते खालीलप्रमाणे...

  • +98 901 014 4557
  • +98 912 810 9115
  • +98 912 810 9109
  • मदतीसाठी ईमेल - [email protected]

भारतीय विद्यार्थ्यांसाठी मदतीसाठी विशेष व्यवस्था

भारतीय विद्यार्थ्यांना आणि इतर असुरक्षित गटांना मदत करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. भारतीय दूतावास त्यांना इराणमधील सुरक्षित प्रदेशात जाण्यास सक्रियपणे मदत करत आहे आणि बदलत्या परिस्थितीनुसार पुढील निर्वासन पर्यायांचा शोध घेत आहे. दरम्यान, इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा, अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि स्थानिक सुरक्षा प्रोटोकॉल आणि अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिल्लीत 24x7 नियंत्रण कक्ष

परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत 24x7 नियंत्रण कक्ष सुरू केला दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मंगळवारी इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी नवी दिल्लीत 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन केला. यासोबतच, तेहरानमधील भारतीय दूतावासाने आपत्कालीन हेल्पलाइन देखील सक्रिय केली आहे. या पार्श्वभुमीवर आता तेहरानमधील विद्यार्थी, त्यांच्या भारतातील नातेवाईकांना दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+