'बेगाने शादी में, अब्दुल्ला दिवाना!', आधीच कर्जावर जगणारा पाकिस्तान म्हणतो आम्ही इराणला मदत करणार!
Iran Israel War : इस्रायल आणि इराणमध्ये सद्या संघर्ष सुरू झालेला आहे. तर दुसरीकडे, या दोन्ही देशांच्या संघर्षात जग दोन गटात विभागलेले दिसत आहे. आता पाकिस्तानचा विचार केला तर आधीच हा देश भीकेला लागलेला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कशीतरी चीन आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेल्या कर्जावर चालू आहे.
अशा कठीण परिस्थितीत, आपल्या देशवासीयांच्या गरजांकडे लक्ष देण्याऐवजी, त्यांनी युद्धात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जगभरातील मुस्लिमांना इस्रायलविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संकेत दिले आहेत की, पाकिस्तानचे सैन्य इराणला मदत करू शकते. ख्वाजा आसिफ म्हणाले की, इस्रायल सर्वांचा शत्रू आहे आणि पाकिस्तान त्याच्याविरुद्ध इराणला पाठिंबा देऊ शकतो. पाकिस्तानने सर्व मुस्लिम देशांना इस्रायलविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन देखील केले आहे. त्यामुळे बेगानी शादी में, अब्दुल्ला दिवाना, अशी म्हण आता पाकिस्तानसाठी लागू होत आहे.

इराण इस्रायल युद्धात पाकिस्तानने उडी घेतली
इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्ताननेही आपली भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की गाझामधील हत्याकांडाविरुद्ध मुस्लिम देशांना एकत्र यावे लागेल.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने इराणवर हल्ला करण्यात आला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो आणि इराणसोबत उभे आहोत.
मुस्लिम ब्रदरहूडचा फासा फेकत ते म्हणाले की, सर्वांना (मुस्लिम बहुसंख्य देशांना) याच्या विरोधात एकत्र यावे लागेल. जर ते थांबवले नाही तर उद्या इस्रायल इतर कोणावरही हल्ला करू शकतो. त्याची हिंमत वाढेल, असेही ते म्हणाले.
इस्रायल हा मुस्लिमांचा कॉमन शत्रू असल्याचा दावा
माध्यमांशी बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले की, आता वेळ आली आहे की मुस्लिमांना एकत्र यावे लागेल. इस्रायल हा आपल्या सर्वांचा सामान्य शत्रू आहे आणि त्याला धडा शिकवण्यासाठी आपली एकता खूप महत्त्वाची आहे. ख्वाजा आसिफ येथेच थांबले नाहीत, तर त्यांनी असेही म्हटले की जर आज इस्रायलला मारले नाही तर येणाऱ्या काळात आपल्या समस्या वाढू शकतात.
इस्त्रायलचा इराणवर हल्ला, लष्करी कमांडर ठार
शुक्रवारी इस्रायलने इराणवर हल्ला केला ज्यामध्ये उच्च लष्करी कमांडर आणि शास्त्रज्ञ मृत्युमुखी पडले आहेत. प्रत्युत्तरादाखल इराणने तेल अवीव आणि जेरुसलेमवर २०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. शनिवारीही दोन्ही बाजूंमधील भयंकर हल्ले सुरूच होते. आतापर्यंत या संघर्षात ७८ इराणी नागरिक आणि २ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.












Click it and Unblock the Notifications