Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दोन आठवड्यांचा वादा अन् काही तासांत 3 ठिकाणे उद्धवस्त,इराणवरील हल्ल्याची अमेरिकेची Inside Story वाचा

America's entry in Iran Israel war, US attacks Iran : अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या कामाची शैली संपूर्ण जगाला माहिती आहे. कधी काय बोलतील, कधी काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही. पण यावेळी त्यांनी जे केले त्यामुळे संपूर्ण जगाला धक्काच बसला.

प्रत्यक्षात, 12 आणि 13 जूनच्या रात्री, जेव्हा इस्रायलने अचानक इराणच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यास सुरुवात केली, तेव्हा अमेरिकेने हात वर केले आणि म्हटले की, आम्हाला या कारवाईची माहिती नव्हती. पण इस्रायलने स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेला सर्व काही गोष्टी माहिती आहेत.

त्यानंतर अमेरिकेने इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कशी एंट्री केली, त्याची देखील कहाणी आता समोर आली आहे. सुरुवातीला पंधरा दिवसाने ठरवू असे म्हणणारे ट्रम्प यांनी काही तासांतच इराणच्या अणु तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला अन् त्याचा परिणाम काय झाला, याविषयी या लेखात इनसाईड स्टोरी जाणून घेऊया..!

America Attack on Iran Inside Story

युद्धात अमेरिकेच्या एंट्रीची इनसाईड स्टोरी काय?

डोनाल्ड ट्रम्प म्हटले की हो, इस्रायलने हल्ला केला आहे, जे बरोबर होते. इराणला अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी देता येणार नाही. आम्ही त्यांना चर्चेसाठी 60 दिवस दिले होते, पण ते सहमत झाले नाहीत. ट्रम्प म्हणाले की इस्रायलचा हल्ला उत्तम होता. पण अमेरिका या युद्धात थेट उडी घेऊ इच्छित नाही.

काही तासांतच इस्रायलला समजले की, इराणच्या जमिनीखाली लपलेले अण्वस्त्र तळ नष्ट करणे त्यांच्या हातात नाही. विशेषतः फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान सारखी ठिकाणे जी जमिनीपासून 90 फूट खाली बांधली आहेत. त्यांना नष्ट करण्यासाठी बंकर बस्टर बॉम्बची आवश्यकता आहे आणि ते फक्त अमेरिकेकडे आहेत.

पंधरा दिवसाने निर्णय घेऊ म्हणाले, अन्....!

दरम्यान, अमेरिका आता इराणवर हल्ला करेल का असा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिका युद्धात उतरेल की नाही हे आम्ही दोन आठवड्यात ठरवू. या काळात अमेरिकेची बी-2 स्टेल्थ बॉम्बर विमाने आखाती देशाकडे उड्डाण करताना दिसली. तीही GBU-57 सारख्या धोकादायक बॉम्बसह.

अमेरिकेची इराणवर हल्ला करण्याची तयारी अंतर्गत सुरू होती. इराणलाही माहिती होती की, अमेरिका त्यांच्यावर हल्ला करू शकते. रविवारी सकाळी हे खरे ठरले.

हे ही वाचा : Iran Israel :इराणवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हटले जाणून घ्या!

ट्रम्प यांनी हल्ल्याबाबत काय केला दावा!

ट्रम्पने पोस्ट करून दावा केला की, अमेरिकेने इराणचे तिन्ही प्रमुख अणु तळ पूर्णपणे नष्ट केले आहेत. इराणच्या वेळेनुसार, रात्री 2:30 वाजता अमेरिकन विमानांनी हल्ला केला.

ट्रम्प यांच्या मते, मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली आणि सर्व लढाऊ विमाने सुरक्षित परतली. इस्रायलने म्हटले - अमेरिका आणि इस्रायलने एकत्र हल्ला केला.

हे ही वाचा : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला; तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्रांचा वर्षाव!

आता ट्रम्प यांना शांतता का हवी?

हल्ल्यानंतर, ट्रम्प आता शांततेबद्दल बोलत आहेत. त्यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की "आता आम्ही शांततेकडे वाटचाल करतो." पण दुसरीकडे, इराणची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे.

त्यांचे सर्वोच्च नेते अली खामेनी म्हणाले की, पॅलेस्टाईन अजूनही आमच्या संघर्षाचे केंद्र आहे आणि आम्ही मागे हटणार नाही. अध्यक्ष मसूद पेझेश्किया यांनी देखील स्पष्ट केले की, इराण त्यांचे युरेनियम समृद्धीकरण थांबवणार नाही. ते म्हणतात की हे पूर्णपणे शांततापूर्ण हेतूंसाठी आहे.

हे ही वाचा : इराणचे सुप्रीम नेते खामनेई ज्या बंकरमध्ये लपलेत तिथे काय आहे सुविधा, इस्त्रायल का हल्ला करू शकत नाही

इराणचा इस्रायलवर हल्ला

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर लगेचच इस्रायलवर इराणनेही जोरदार हल्ला सुरू केला आहे. जरी इस्रायलचे हवाई संरक्षण सक्रिय असले तरी युद्ध आता अशा टप्प्यावर आहे. जिथे कोणाचा विजय किंवा पराभव निश्चित केला जाऊ शकतो.

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इराणचे हवाई संरक्षण आतापर्यंत प्रत्युत्तर देऊ शकलेले नाही. रशियाकडून मिळालेल्या एस-300 क्षेपणास्त्र प्रणाली आतापर्यंत सक्रिय झालेल्या नाहीत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+