Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नसराल्लाहच्या मृत्यूनंतर इराणने दिला खुला इशारा! UNSC ला आपत्कालीन बैठक बोलावण्याचे आवाहन

Iran calls for emergency meeting of UNSC : इस्त्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये सुरु असलेल्या धुमश्चक्रीत दिवसागणीक संघर्ष वाढतानाच दिसत आहे. कालच इस्रायल संरक्षण दलाने हिजबुल्लाहचा सर्वोच्च कमांडर नसरुल्लाहची हत्या केली. यानंतर इराण आक्रमक झाला अशून नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतर इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.

इराणने लेबनॉनमधील इस्रायलच्या कारवाया आणि प्रदेशातील व्यापक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी यासंदर्भात आपत्कालीन बैठकीचे आवाहन केले आहे. इराणचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत आमिर सईद यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 15 सदस्यांना पत्र लिहून तात्काळ कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

Iran calls for emergency meeting of UNSC

इराणचा इशारा

इराणने आपल्या राजनैतिक स्थळांवर, भुभागावर आणि त्यांच्या प्रतिनिधींवर कोणताही हल्ला होऊ नये तसे झाल्यास हल्ल्याविरुद्ध कडक उत्तराचा इशाराही दिला. इराणच्या राजदूतांनी सांगितले की, इराण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आपल्या भूभागाचे संरक्षण करण्यात अजिबात मागेपुढे पाहणार नाही.

येणारे दिवस आव्हानात्मक - नेत्यान्याहू

इस्त्रायलने नसरुल्लाह यांची हत्या केल्यानंतर या घटनेचे जागतिक पटलावर तीव्र पडसाद उमटत आहेत. जगभरातील प्रमुख नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा एक निश्चित क्षण असल्याचे म्हटले आहे. यासोबतच नेतन्याहू म्हणाले की, येणारे दिवस आव्हानात्मक असू शकतात. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, नसरुल्लाह यांचे दीर्घकाळ चाललेले दहशतवादी राजवट संपले आहे.

भारतीय नागरिकांना सावधानतेचा इशारा

इस्त्रायल हिजबुल्लाह यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत. बेरूतमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना अधिक सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे तसेच लेबनॉनचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय नागरिकांच्या सुरक्षेची वाढती चिंता लक्षात घेऊन ही सूचना जारी करण्यात आली आहे.

इस्रायली हवाई हल्ल्यांत 33 लोक ठार, 195 जखमी

शनिवारी 33 ठार इस्त्रायल आणि लेबनॉनमधील संघर्षाचा विनाशकारी परिणाम झाला आहे, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे 33 लोक ठार आणि 195 जखमी झाले. इराणचा अमेरिकेवर आरोप: इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेवर आरोप केला आहे की अमेरिकेने या संपूर्ण ऑपरेशनला पाठिंबा दिला, ज्यामध्ये नसरुल्ला आणि इतरांचा मृत्यू झाला.

लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, अवघ्या दोन आठवड्यांत १५६ महिला आणि ८७ मुलांसह १,०३० लोकांनी आपला जीव गमावला आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+