Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाक एअरपोर्टवर आगीनंतर 'त्या' मुस्लिम देशात भीषण स्फोट; 500 हून अधिक जखमी, मृतांचा अंदाज लागेना...

इराणच्या बंदर अब्बास शहरात आज शनिवारी एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात 500 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ओमानमध्ये अमेरिका आणि इराणमधील आण्विक चर्चेचा तिसरा टप्पा सुरू असताना, हा स्फोट झाला आहे. स्फोटाचे कारण लगेचच समजू शकले नसले तरी, स्फोटावेळी बंदरात काम करणाऱ्या कामगारांची संख्या पाहता मृतांचा आकडा लक्षणीय असल्याचे सांगण्यात येते.

explosion at Iranian port

स्फोटानंतर प्रचंड आग

एका स्थानिक अधिकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शाहिद राजाई बंदराच्या घाट परिसरात साठवलेल्या अनेक कंटेनरमध्ये स्फोट झाल्याने स्फोटांची तीव्रता वाढली. स्थानिक बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना बाहेर काढून वैद्यकीय केंद्रात पाठविण्याचे काम सुरु आहे. बंदर अब्बास शहरातील शाहिद राजी बंदरावर हा स्फोट झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि बंदरातील कामे थांबवण्यात आली. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्फोट इतका शक्तिशाली होता की अनेक किलोमीटर अंतरावरील खिडक्यांच्या काचा फुटल्या.

स्फोटाचे कारण काय?

बंदरात साठवलेल्या कंटेरनमध्ये हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला व त्याची तीव्रता एवढी जास्त का होती, याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरु झाले असून या स्फोटात मृत व जखमींचा आकडा वेळोवेळी वाढत आहे. सुरुवातीला 200 जखमी असल्याचे वृत्त होते मात्र आता जखमींची संख्या 500असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मृतांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+