या युरोपीय देशाचे नव्या पीएम आहेत अतिशय सुंदर; डोळे आहेत निळे, रशिया-युक्रेनशी आहे खास नातं!
Inga Ruginiene Lithuanias New Prime Minister : युरोपीय देश लिथुआनियाने अलीकडेच आपली नवीन पंतप्रधान म्हणून इंगा रुगिनीन यांची निवड केली आहे. माजी कामगार संघटना नेत्या असलेल्या रुगिनीन यांची नियुक्ती अचानकपणे झाली असून, या निवडीने लिथुआनियाच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. त्यांच्या निवडीला 78 मतांनी मान्यता मिळाली, तर 35 मते विरोधात पडली.

रुगिनीन यांचे जीवन अन् युक्रेन-रशिया संबंध
24 मे 1981 रोजी त्राकाई येथे जन्मलेल्या रुगिनीन यांचे बालपण राजधानी विल्नियसमध्ये गेले. त्यांचे जीवन लिथुआनिया, युक्रेन आणि रशियाशी जोडलेले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्या अनेकदा पूर्व युक्रेनमधील क्रामाटोर्स्क शहरात जात असत, जिथे त्यांचे कुटुंब आणि नातेवाईक राहतात. या वैयक्तिक संबंधांमुळेच त्यांना युक्रेनची परिस्थिती अधिक जवळून समजते. म्हणूनच त्यांनी रशियाच्या आक्रमक धोरणांवर सातत्याने टीका केली आहे आणि युक्रेनच्या समर्थनार्थ ठामपणे आवाज उठवला आहे.
राजकारणाबाहेरील व्यक्तिमत्त्व
राजकारणाव्यतिरिक्त, रुगिनीन यांना वाचनाची खूप आवड आहे. त्यांना विशेषतः रहस्य-थ्रिलर आणि गुप्तहेर कथा आवडतात. त्यांचे आवडते पुस्तक 'द लिटिल प्रिन्स' आहे. राजकारणाच्या व्यस्त जीवनातून आराम मिळवण्यासाठी त्या प्रवास आणि चित्रकला यांसारख्या छंदातही रमतात. या गोष्टी त्यांचे एक वेगळे, संवेदनशील आणि शांत व्यक्तिमत्त्व दर्शवतात.
पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास
रुगिनीन यांनी यापूर्वी गिंटास पालुकास यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक व्यवहार आणि कामगार मंत्री म्हणून काम केले होते. पालुकास यांना त्यांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबतच्या चौकशीमुळे जुलैमध्ये राजीनामा द्यावा लागला. यानंतर, रुगिनीन यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळाली. त्यांच्याकडे संसदेत १४१ पैकी ८२ जागांसह बहुमत असल्यामुळे त्यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. राष्ट्रपतींकडून औपचारिक नियुक्ती आणि शपथविधी ही आता केवळ औपचारिकता बाकी आहे.
संवेदनशील भौगोलिक स्थिती
युरोपियन युनियन आणि नाटोचा सदस्य असलेला लिथुआनिया पश्चिम आघाडीच्या पूर्वेकडील टोकावर आहे. या देशाच्या सीमा रशियाच्या कॅलिनिनग्राड एक्सक्लेव्ह आणि रशियाचा मित्र असलेल्या बेलारूसशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे, लिथुआनियाची भौगोलिक स्थिती खूप संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत, युक्रेनला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या रुगिनीन यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरू शकते.












Click it and Unblock the Notifications