IMF ने दिलेले 1 अब्ज डॉलर पाकिस्तान आर्थिक सुधारणेसाठी वापरणार की दहशतवादाला पोसणार?
India Pakistan war : पाकिस्तानचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळेवेगळे आहे, हे आता चीनलाही समजले. त्यामुळेच त्याला छदामही चीनने दिलेला नाही ना भारत पाक संघर्षात पाकिस्तानची बाजू घेतली. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरावे लागले. त्यांच्या देशात आर्थिक समस्या फार आहेत. अशातच भारताशी लढताना आर्थिक खाईत पाकिस्तान अवघ्या दोन तीन दिवसांत लोटला गेला.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जवळपास 1 अब्ज डाॅलर पाकिस्तानला दिले आहेत, आता पाकिस्तानला एवढे कर्ज देण्यावरुन भारताने तीव्र नाराजी दर्शविली असून हा पैसा चुकीच्या गोष्टींसाठी पाकिस्तान आपल्या नेहमीच्या वागण्याप्रमाणे लावू शकतो अशी शक्यता आहे. अशातच नाणेनिधीनेही काही अटी आणि शर्तीवर ही रक्कम दिली आहे.

.. तर बंदुक हाती असलेल्याच्या हाती जखम
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती सतत खालावत चालली आहे. परकीय कर्ज, महागाई, घसरणारा रुपया आणि घटता कर संकलन या त्याच्या मुख्य समस्या आहेत. पाकिस्तानी रुपया आता भारतीय रुपयापेक्षा तिप्पट कमकुवत झाला आहे आणि गुंतवणूकदारांचा विश्वासही डळमळीत झाला आहे. त्यातच पाकिस्तानी शेअरबाजारातही पडछड झालेली दिसत आहे. पाकिस्तानला पैसे देणे म्हणजे बंदुक हाती असलेल्या जखमीला औषध देणे.
पाकिस्तानला देण्यात आलेल्या रकमेवरुन भारताने चिंता व्यक्त केली आहे. ही गोष्ट केवळ आर्थिक नाही तर रणनितीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. आंतकवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत म्हणजे बंदुक हाती असलेल्या जखमीला औषध देणे असेही मतं आता येत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कर्ज कोणत्या आधारावर दिले
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कोणत्याही देशाला आर्थिक मदत देतो तेव्हा त्यात आर्थिक सुधारणांच्या अनेक अटी असतात. विकास आणि इतर मानवतावादी आणि विकास उत्थानासाठी देतात. भारतीय अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या अटींमध्ये दहशतवादावरील नियंत्रणे किंवा लष्करी खर्चाचा समावेश नाही. ही खूप मोठी चूक मानली जात आहे.
पाकिस्तानला दिलेल्या निधीवर अमेरिकेची भूमिका कशी असेल?
पाकिस्तानला आयएमएफने दिलेल्या आर्थिक मदतीवर आता अमेरिकेची भूमिका काय असेल याचा अंदाज लावला जात आहे. भारताचे मत आहे की, जर अमेरिका पाकिस्तानला चीनच्या जवळचा देश समजत असेल तर तो आर्थिक मदत देण्यावरुन कडक धोरण अवलंबवेल,पण राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानला अमेरिका सहयोगी मानत असेल तर त्यांना मदत मिळत राहील आणि दहशतवादी कारवाया सुरुच राहतील.
हेही वाचा : Pakistan News : पाकच्या पतंप्रधानांच्या उलट्या बोंबा! भारताविरुद्ध बदल्याची भाषा, काय गरळ ओकली? वाचा












Click it and Unblock the Notifications