Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

India reaction Trump-Putin : ट्रम्प-पुतिन भेटीवर भारताची पहिली प्रतिक्रिया; संवाद अन् राजनैतिकतेने..

India reaction Trump Putin meeting 2025 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे झालेल्या शिखर परिषदेतील भेटीचे भारताने स्वागत केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (15 ऑगस्ट 2025) एक अधिकृत निवेदन जारी करून जगाला शक्य तितक्या लवकर युद्ध संपवायचे असल्याचे म्हटले आहे.

India reaction Trump Putin meeting Alaska summit

शांततेसाठी नेतृत्वाचे कौतुक

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या भेटीचे स्वागत करताना म्हटले की, "अलास्कामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील शिखर परिषदेचे भारत स्वागत करतो.

शांततेसाठी त्यांचे नेतृत्व कौतुकास्पद आहे आणि या शिखर परिषदेत झालेल्या प्रगतीचे भारत कौतुक करतो." ते पुढे म्हणाले की, केवळ संवाद आणि राजनैतिकतेद्वारेच पुढे जाण्याचा मार्ग शोधता येईल. भारताने नेहमीच शांतता आणि संवादाला प्राधान्य दिले आहे.

हे ही वाचा : ट्रम्प-पुतिन बैठक अयशस्वी; 5 प्रमुख कारणांमुळे चर्चेतून कोणताही ठोस तोडगा नाही

शिखर परिषदेतील चर्चेचे मुद्दे

ट्रम्प आणि पुतिन यांच्यात सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीनंतर, दोन्ही नेत्यांनी एक संक्षिप्त संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कोणताही मोठा करार जाहीर करण्यात आला नाही, तरीही ट्रम्प यांनी ही चर्चा "खूप उपयुक्त" असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी आशा व्यक्त केली की, आम्ही ज्या करारावर पोहोचलो आहोत तो आम्हाला त्या ध्येयाच्या जवळ जाण्यास मदत करेल आणि युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग मोकळा करेल.

विशेष म्हणजे, या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त 25 टक्के शुल्क लावल्याचा दावा केला होता. या बैठकीत रशिया आणि अमेरिकेचे संबंध सुधारण्यासोबतच युक्रेनमधील युद्ध थांबवण्यावरही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

ट्रम्प-पुतिन पत्रकार परिषदेतील ५ महत्त्वाचे मुद्दे

  • ट्रम्प आणि पुतिन यांच्यात ३ तास काय चर्चा झाली याची माहिती नाही.
  • 12 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी कोणत्याही पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
  • ट्रम्प म्हणाले की बैठक सकारात्मक होती, परंतु अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही.
  • पुतिन म्हणाले की युक्रेन युद्ध संपवण्यासाठी त्याचे खरे कारण दूर करणे आवश्यक आहे.
  • पुतिन म्हणाले की जर ट्रम्प २०२२ मध्ये राष्ट्राध्यक्ष असते तर युक्रेन युद्ध झाले नसते.

ट्रम्प-झेलेन्स्की यांनी केली दीड तास चर्चा

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक्स वर पोस्ट केले की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दीड तासांपेक्षा जास्त काळ दीर्घ चर्चा केली. या दरम्यान, दोन्ही नेत्यांनी सुमारे एक तास एकटे चर्चा केली आणि त्यानंतर युरोपियन नेत्यांनाही सामील करण्यात आले.

झेलेन्स्की म्हणाले की युक्रेन पूर्ण ताकदीने शांतता प्रस्थापित करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीची आणि संभाषणाची माहिती दिली.

युक्रेनने युक्रेन, अमेरिका आणि रशियाची त्रिपक्षीय बैठक घेण्याच्या ट्रम्पच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. झेलेन्स्की सोमवारी वॉशिंग्टन डीसीला जातील आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतील आणि युद्ध संपवण्याबाबत सविस्तर चर्चा करतील.

झेलेन्स्की म्हणाले की, अमेरिकेसह मजबूत सुरक्षा हमी देण्यासाठी युरोपीय देशांचा सहभाग आवश्यक आहे. त्यांनी अमेरिकेकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचे स्वागत केले आणि सर्व सहयोगी देशांचे आभार मानले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+