Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेचा टॅरीफ टाळण्यासाठी भारताचा 'हा' आहे प्लॅन; ट्रम्प जो कर आकारणार तो काय आहे? जाणून घ्या

India can respond to Donald Trump's tariff hike : ​​डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला तेव्हापासून ते एकामागून एक निर्णय घेत आहेत ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मुळात अडचण ही आहे की, ते भारतविरोधी काही निर्णय अलीकडे घेत आहेत, ज्याचे भारताला नुकसान होऊ शकते, या- ना त्या मार्गाने ते भारताला अडचणीत आणण्याचाच प्रयत्न करत आहेत.

अलीकडेच त्यांनी एक निर्णय घेतल्याने जगभरात व्यापारयुद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी इतर देशांतून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्क लादल्यानंतर ट्रम्प यांनी आता भारत, चीन, ब्राझील आणि युरोपियन युनियनवर 2 एप्रिलपासून परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. असे जरी असले तरीही भारतही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विदेश नितीला उत्तर द्यायला तेवढाच समर्थ आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ लादल्याच्या प्रत्युत्तरात भारताने कोणती पावले उचलली हे या अहवालात जाणून घेऊया.

India can respond to Donald Trump s tariff hike

सिप्रोकल टॅरिफ काय असते?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी 4 मार्च 2025 जाहीर केले की, ते 2 एप्रिलपासून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर परस्पर शुल्क लागू करणार आहेत. याचा अर्थ जो देश अमेरिकेतून आयात केलेल्या वस्तूंवर कर वसूल करतो, त्याच देशावर अमेरिकाही आपल्या देशात आयात केलेल्या मालावर त्याच दराने कर वसूल करेल. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर खळबळ उडाली होती.

भारताकडून उत्तर देण्याची तयारी

वाणिज्य मंत्री पियुष गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, भारतानेही अमेरिकेने लादलेल्या शुल्काला उत्तर देण्याची तयारी केली आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, भारत सरकार या विषयावर उच्च पातळीवर विचारमंथन करत आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे व्यापार चर्चेसाठी जवळपास आठवड्याभराच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना ट्रम्प यांची टिप्पणी अशा वेळी आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2 एप्रिलपासून लागू होणारे शुल्क टाळण्यासाठी भारताने तयारी केली आहे. दोन्ही देशांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवण्याची तयारी केली आहे. या मुद्द्यावर जे काही प्रश्न आहेत ते आपापसात चर्चेने सोडवले जावेत, अशी दोन्ही देशांची इच्छा आहे.

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या नैतृत्वात अमेरिका दौऱ्यावर पोहचलेल्या भारतीय प्रतिनिधींचा चमू, पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यात 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीतील व्यापाराशी संबंधित निर्णयांना अंतिम रूप देण्यासाठी गेले आहे. भारत हे प्रकरण चर्चेतूनच सोडवेल, असा विश्वास भारतीय अधिकाऱ्यांना आहे. त्याला 2 एप्रिलपासून शुल्क भरावे लागणार नाही.

काय म्हणाले होते ट्रम्प?

यूएस संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केलेल्या भाषणादरम्यान 2 एप्रिलपासून काउंटरवेलिंग ड्यूटी आणि नॉन-टेरिफ उपाय लागू केले जातील, जे काही वर्षांपासून व्यापार असमतोल संतुलित करण्यासाठी केले जात आहेत

ट्रम्प यांनी भारताचे नाव घेतले नव्हते

ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात भारताचे नाव घेतले नसले तरीही त्यांनी अमेरिकेपेक्षा जास्त शुल्क आकारणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाला, "जर तुम्ही तुमचे उत्पादन युनायटेड स्टेट्समध्ये बनवले नाही तर... तुम्हाला टॅरिफ भरावे लागतील, आणि काही बाबतीत ते टॅरिफ खूप मोठे असतील. इतर देशांनी आमच्या विरोधात अनेक दशकांपासून टॅरिफचा वापर केला आहे आणि आता आमची पाळी आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+