Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्प अन् झेलेन्स्की यांच्यात कशी झाली खडाजंगी; भर पत्रकार परिषदेत कसे भिडले, वाचा शब्दन शब्द

Conversation between US President Donald Trump and Ukrainian President Volodymyr Zelensky : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची शुक्रवारी रात्री उशिरा व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली. यादरम्यान ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हेन्स आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

भेटीनंतर तिन्ही नेते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी युद्ध शांततेचा मार्ग निवडला पाहिजे, असे व्हेन्स यांनी प्रस्ताव ठेवताच, झेलेन्स्की यांनी नकार दिला अन् तिन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा अपमना केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. या नेत्यांमध्ये कसा संवाद झाला, नेमकं कुठं वाद सुरू झाला याचा शब्दन शब्द वाचा...!

Donald Trump- Zelensky Conversation in Marathi

ट्रम्प, झेलेन्स्की आणि व्हंन्स यांच्यातील संपूर्ण संभाषन जशाच्या तसे तुमच्यासमोर.. वाचा सविस्तर....

शुक्रवारी रात्री 10 वाजता नेत्यांमध्ये भेट

रात्री १० वाजता झेलेन्स्की ट्रम्प यांना भेटण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये पोहोचले तेव्हा ट्रम्प यांनी त्याचे स्वागत केले. दोघांनीही हस्तांदोलन केले, त्यानंतर ट्रम्पने झेलेन्स्कींकडे बोट दाखवत माध्यमांना सांगितले, 'ते आज चांगली तयारी करून आले आहेत.

झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात संवाद सुरु झाला

दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू झाली. दोन्ही राष्ट्रपती व्हाइट हाऊसच्या ओव्हल हाऊसमध्ये पोहोचले. इथे दोघांमधील संभाषण माध्यमांसमोर सुरू झाले. ट्रम्प म्हणाले की जर ते आणि झेलेन्स्की एकत्रितपणे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवू शकले तर ते खूप चांगले होईल. झेलेन्स्कींनी ट्रम्प यांना युद्धाचे फोटो दाखवले.

  • झेलेन्स्की म्हणाले - शांतता करारात पुतिन यांच्याशी कोणतीही तडजोड होऊ नये. ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान झेलेन्स्की म्हणाले, 'शांतता करारात रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी कोणतीही तडजोड होऊ नये.'

ट्रम्प म्हणाले - 'आम्हाला हे युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे. आशा आहे की आपल्याला अधिक सैन्य पाठवावे लागणार नाही. खनिज कराराची मला प्रशंसा आहे. कारण आम्हाला त्याची गरज होती. आपल्या देशाला आता न्याय्य वागणूक दिली जात आहे.

Donald Trump- Zelensky Conversation in Marathi

  • ट्रम्प म्हणाले - जर मी रशिया आणि युक्रेन दोघांशी समन्वय साधला नसता तर कोणताही करार शक्य झाला नसता. मी पुतिनसोबत नाही किंवा इतर कोणासोबतही नाही. मी फक्त अमेरिकेसोबत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीस मिनिटे चर्चा झाली यातच अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी संभाषणात व्यत्यय आणल्याने त्याचे रूपांतर अखेर वादात व खडाजंगीमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले.

व्हेन्स: युक्रेनमध्ये शांतता आणि समृद्धीचा मार्ग केवळ राजनैतिक मार्गानेच येईल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हेच करत आहेत. तुमचा दृष्टिकोन खूपच अनादरपूर्ण आहे. ही योग्य राजनयिकता नाही. हे युद्ध थांबवल्याबद्दल तुम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले पाहिजेत...

  • झेलेन्स्की (व्हेन्स यांना) - 2014 मध्ये जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले, तेव्हा अनेक वाटाघाटी झाल्या. 2019 मध्ये मी एक करार केला आणि मला आश्वासन देण्यात आले की युद्धबंदी लागू केली जाईल. दोन्ही बाजूंच्या युद्धकैद्यांना सोडण्यात येणार होते, परंतु पुतिन यांनी हा करार मोडला आणि 2022 मध्ये मोठा हल्ला केला.

झेलेन्स्की (व्हॅन्सकडे पाहत): जे.डी. व्हेन्स, ही कसली राजनयिकता आहे? याचा अर्थ काय?

  • व्हेन्स: मी अशा राजनयिकतेबद्दल बोलत आहे जी तुमच्या देशावर होत असलेल्या विध्वंसाला थांबवेल.

व्हेन्स : ओव्हल ऑफिसमध्ये येऊन अमेरिकन मीडियासमोर हे मांडणे हे तुमचा अनादर करणारे आहे असे मला वाटते. तुमच्याकडे आवश्यक सैन्य नसल्याने तुम्ही सीमेवर कमकुवत आहात. युद्धात मदत केल्याबद्दल तुम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले पाहिजेत.

  • झेलेन्स्की ( व्हेन्स यांना मध्येच थांबवत): तुम्ही युक्रेनला गेला आहात का, तिथे येणाऱ्या समस्या कधी पाहिल्या आहेत का? एकदा येऊन तर बघा...!

व्हेन्स: मी त्याबद्दल वाचले आहे आणि पाहिले आहे. पण तुमच्या देशाचा विनाश थांबवू इच्छिणाऱ्या त्या देशाच्या प्रशासनाबद्दल अनादरपूर्ण वृत्ती दाखवणे तुम्हाला योग्य वाटते का?

  • झेलेन्स्की: जेव्हा तुम्ही युद्धात असता तेव्हा सर्वांनाच समस्या येतात. या युद्धाचा भविष्यात अमेरिकेवरही परिणाम होईल.

ट्रम्प: आम्हाला काय वाटले पाहिजे ते सांगू नका. आपण काय वाटावे हे सांगण्याच्या स्थितीत तुम्ही नाही.

  • झेलेन्स्की: मी तुम्हाला सांगत नाहीये. मी फक्त त्यांच्या (व्हेन्सच्या) प्रश्नाचे उत्तर देत आहे. ट्रम्पने झेलेन्स्कींना पुन्हा गप्प केले.

ट्रम्प (बोट दाखवत): तुम्ही आम्हाला काहीही सांगण्याच्या स्थितीत नाही आहात. तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी खेळत आहात. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेवर जुगार खेळत आहात. तुम्ही या देशाचा अपमान करत आहात.

  • झेलेन्स्की (व्यत्यय आणत): या युद्धाच्या सुरुवातीपासून आपण एकटे आहोत आणि त्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत.

ट्रम्प (रागाने) : तुम्ही एकटे नाहीत. तुम्ही अजिबात एकटे नाहीत. या मूर्ख अध्यक्ष (बायडेन) द्वारे आम्ही तुम्हाला ३५० अब्ज डॉलर्स दिले.

  • झेलेन्स्की : मी तुमचा खूप आदर करतो. तेवढ्यात व्हेन्स पुन्हा एकदा या संभाषणात येतात...

व्हेन्स: या बैठकीत तुम्ही एकदाही 'धन्यवाद' म्हटले का?

  • झेलेन्स्की: हो, बऱ्याच वेळा, आजही...

व्हेन्स : नाही, तुम्ही ऑक्टोबरमध्ये पेनसिल्व्हेनियाला गेला होतात आणि तिथे आमच्या प्रतिस्पर्ध्यासाठी प्रचार केला. तुमच्या देशाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेबद्दल आणि राष्ट्राध्यक्षांबद्दल थोडी कृतज्ञता व्यक्त करा.

  • झेलेन्स्की: तुम्हाला वाटतं की जर तुम्ही युद्धाबद्दल मोठ्याने बोललात तर...

( त्यावेळी ट्रम्प त्यांच्या संभाषण थांबवतात)

ट्रम्प: ते (व्हान्स) मोठ्याने बोलत नाहीयेत. तुमचा देश मोठ्या संकटात आहे, एवढेच सांगत आहे. तेवढ्यात पुन्हा झेलेन्स्की बोलण्याचा प्रयत्न करतात, पण ट्रम्प हात हलवून त्यांना थांबवतात.

  • ट्रम्प: नाही, नाही, तुम्ही पुरेसे सांगितले. तुमचा देश मोठ्या संकटात आहे.

झेलेन्स्की: मला माहित आहे, मला माहित आहे.

  • ट्रम्प ( कठोर स्वरात): तुम्ही हे युद्ध जिंकत नाही आहात. पण आमच्यामुळे, तुम्हाला यातून सुरक्षित बाहेर पडण्याची उत्तम संधी आहे.

झेलेन्स्की (ट्रम्पला थांबवत): युद्धाच्या सुरुवातीपासून आपण एकटे आहोत... तेव्हा पुढे बोलत असताना झेलेन्स्कीला पुन्हा ट्रम्प बोलू देत नाहीत.

  • ट्रम्प: तुम्ही एकटे नव्हता. मूर्ख अध्यक्ष (बायडेन) द्वारे आम्ही तुम्हाला 350 अब्ज डॉलर्स दिले. तुम्हाला लष्करी उपकरणे दिली. जर शस्त्रे नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपले असते.

झेलेन्स्की: तीन दिवस... पुतिन म्हणाले की 3 दिवसांत सर्व काही संपेल.

  • ट्रम्प: याला काही अर्थ नाही... असा करार करणे खूप कठीण होईल. तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

(संभाषणात पुन्हा व्हेन्स पुन्हा प्रवेश करतात.)

  • व्हेन्स: आता ते सोडा, धन्यवाद म्हणा.

झेलेन्स्की: मी हे अनेक वेळा सांगितले आहे.

  • व्हेन्स: तुम्ही मीडियाशी असे बोलत आहात, पण आम्हाला माहित आहे की तुम्ही चुकीचे आहात.

ट्रम्प: तुम्ही धन्यवाद म्हणावे. लोक मरत आहेत. तुम्ही लढाईत खूप मागे आहात. तुम्ही नेहमी म्हणता की मी युद्धबंदी करणार नाही (झेलेन्स्कीचे अनुकरण करत) पण तुम्हाला ते करावेच लागेल.

  • ट्रम्प: जर आत्ताच युद्धबंदी होऊ शकली तर मी तुम्हाला तेच करण्यास सांगेन, जेणेकरून विध्वंस थांबेल.

झेलेन्स्की (शांतपणे) : अर्थात, मला युद्ध थांबवायचे आहे.. मला ठोस हमीसह युद्धविराम हवा आहे. तुम्ही युक्रेनच्या लोकांना युद्धबंदीबद्दल त्यांचे काय मत आहे ते विचारा

झेलेन्स्की अमेरिकेत कोणत्या करासासाठी गेले होते

झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातील या बैठकीत खनिजांबाबतचा करार होणार होता, परंतु हा करार रद्द करण्यात आला. युक्रेनने अमेरिकेला दुर्मिळ पृथ्वी साहित्य पुरवण्यास सहमती दर्शविली. या कराराच्या बदल्यात अमेरिकेने युक्रेनच्या पुनर्विकासात मदत करण्याचे म्हटले आहे. ट्रम्प गेल्या महिन्याभरापासून युक्रेनवर दुर्मिळ खनिजे देण्यासाठी दबाव आणत होते. जर असे झाले नाही तर त्यांनी अमेरिकन निधी थांबवण्याची धमकी दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+