Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गाझामध्ये इस्रायलचा जोरदार हल्ला; दोन अधिकाऱ्यांसह 54 पॅलेस्टिनी ठार

इस्रायली सुरक्षा दल आणि गाझामध्ये पुन्हा संघर्ष पेटला आहे. हे हल्ले आता आणखी तीव्र झाले आहेत. गाझा पट्टीमध्ये इस्रायलने गुरुवारी केलेल्या हवाई हल्ल्यात महिला, मुले आणि दोन उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांसह 54 पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या हल्ल्यात हमासच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेतील एका वरिष्ठ सदस्याला लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायली सैन्याने अल-मवासी जिल्ह्यातील एका तंबूच्या छावणीवर हल्ला केला. ज्यात 11 लोक मारले झाले. या हल्ल्यात गाझाचे पोलीस महासंचालक महमूद सलाह आणि त्याचा सहकारी हुसम शाहवान यांचाही मृत्यू झाल्याचा दावा हमास संचालित अंतर्गत मंत्रालयाने केला आहे.

Israel s attack

हवाई हल्ल्यात 43 लोक ठार

पहिल्या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह 11 लोक मारल्यानंतर इस्रायलने दुसऱ्या हवाई हल्ल्यात किमान 43 पॅलेस्टिनी ठार केल्याचा दावाही केला जात आहे. दुसऱ्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये खान युनिसमधील गृह मंत्रालयाच्या मुख्यालयात सहा आणि उत्तर गाझामधील जबलिया शरणार्थी शिबिर, शाती शिबिर आणि मध्य गाझामधील माघाझी शिबिरातील काही जणांचा समावेश होता. काही वृत्तवाहिन्यांच्या मते, इस्रायली सैन्याने अल-मवासीमधील गुप्तचर माहितीच्या आधारे हल्ल्याची पुष्टी केली आहे. गाझामधील हमासच्या सुरक्षा दलाचे प्रमुख शाहवानला लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, लष्कराने सलाहच्या मृत्यूबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही.

संरक्षणमंत्र्यांनी इशारा दिला

हमासने काही जणांना ओलीस ठेवले आहे. हे ओलीस सोडले नाही आणि इस्रायलवर गोळीबार थांबवला नाही तर त्यांना गाझामध्ये मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ यांनी बुधवारी एका निवेदनात दिला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने युद्धात आतापर्यंत 45,500 हून अधिक पॅलेस्टिनींना ठार केले आहे. त्यात महिला आणि मुलेही आहेत. युद्धानंतर गाझातील 2.3 दशलक्ष लोकांपैकी बहुतेक लोक विस्थापित झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+