मोठी बातमी! इस्रायलच्या हल्ल्यात हमास लष्करप्रमुख मोहम्मद दाईफ ठार!
हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद दाईफ हे इस्त्रायलने केलेल्या हल्ल्या मारला गेला आहे. इस्रायली लष्कराने आज हा दावा केला आहे. 13 जुलै रोजी गाझा येथील खान युनिस येथे झालेल्या हवाई हल्ल्यात दैफ मारला गेल्याचे लष्कराने सांगितले.
मोहम्मद दाईफ यांच्या मृत्यूची बातमी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती, मात्र इस्रायलने आता याला दुजोरा दिला आहे. वृत्तानुसार, इस्रायलवरील हल्ल्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या हमासच्या तीन मोठ्या नेत्यांमध्ये दैफचाही समावेश होता.

विेशेष म्हणजे हमासचे प्रमुख इस्माईल हानिया आणि लष्करी अधिकारी फुआद शुकर या दोघांची इस्त्रायलने हत्या केली होती. त्यानंतरची ही तिसरी हत्या आहे. मोहम्मद दाईफचा हा फोटो टाईम्स ऑफ इस्रायलने शेअर केला आहे. हा प्रकार कधी घडला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
7 वेळा वाचला दाईफ
इस्रायलने 7 वेळा दैफला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी झाला नव्हता. हमासच्या तीन मोठ्या नेत्यांपैकी मोहम्मद दाईफ आणि इस्माईल हनीया यांचा मृत्यू झाला आहे. याह्या सिनवार हे एकमेव मोठे नेते उरले आहेत. याआधी 31 जुलै रोजी तेहरानमध्ये झालेल्या हल्ल्यात हानीह मारला गेला होता. तेव्हापासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
काय आहे दावा?
13 जुलै रोजी इस्रायलने अल-मवासी कॅम्पवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात 90 जणांचा मृत्यू झाला होता, तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात हमासचा लष्करी प्रमुख दाईफ मारला गेल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला होता.
मात्र, दुसऱ्याच दिवशी हमासने हा दावा फेटाळून लावला. गतवर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा दैफ मास्टरमाईंड होता. त्यांनी या ऑपरेशनला 'अल अक्सा फ्लड' असे नाव दिले होते.
Muhammad Deif, the ‘Osama Bin Laden of Gaza,’ was eliminated on 13.07.24. This is a significant milestone in the process of dismantling Hamas as a military and governing authority in Gaza, and in the achievement of the goals of this war.
— יואב גלנט - Yoav Gallant (@yoavgallant) August 1, 2024
The operation was conducted precisely and… pic.twitter.com/WCgL5fBkEC
इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्याने दिली पुष्टी
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी दैफच्या मृत्यूची पुष्टी केली आणि गाझामधून दहशतवादाचा नायनाट करण्याच्या उद्दिष्टात हे एक मोठे पाऊल असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्रायली सैन्याने 13 जुलै रोजी गाझा येथील ओसामा बिन लादेन 'डायफ' याला ठार केले. आता आम्ही हमासचा खात्मा करण्याच्या अगदी जवळ आलो आहोत.
'आत्मसमर्पण किंवा आता मरण'
गॅलंटने त्याच्या पोस्टसह एक फोटो देखील शेअर केला आहे. यात गॅलंट म्हणाले, "आम्ही आमच्या उद्दिष्टाच्या जवळ आहोत, हे आयडीएफ आणि शिन बेट टीमच्या संयुक्त ऑपरेशनने हे सिद्ध केले आहे. आता दहशतवाद्यांकडे दोनच पर्याय उरले आहेत, एकतर त्यांनी आत्मसमर्पण करावे किंवा मरण."












Click it and Unblock the Notifications