दुबईत भारतापेक्षा सोने स्वस्त; दुबईतून किती सोने आणता येते? कायदेशीर मर्यादा किती? किती पैसे वाचतात?
तुम्ही जुने म्हणजेच ७०-८० च्या दशकातील सिनेमे पाहिले असतील तर, तुम्हाला त्या चित्रपटात दुबईतून आणलेल्या सोन्याच्या तस्करीचे अनेक सीन्स दिसले असतील. कारण भारतापेक्षा दुबईत सोने हे खूपच स्वस्त आहे. आजच्या बाजारभावाचा विचार केला तर, दुबईत भारतापेक्षा ८.९ टक्क्यांनी सोने स्वस्त आहे. दुबईत मेकींग चार्जेस किंवा व्हॅट नसल्याने ते सोने खूपच स्वस्त असते. काही दिवसांपूर्वी कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला दुबईतून सोन्याची तस्करी करताना अटक झाली होती. पण दुबईतून कायदेशीर पद्धतीनेही सोने आणता येते, हे तुम्हाला माहीत आहे का? चला आपण आज हाच विषय समजून घेऊ...

दुबईतून किती सोने आणता येते?
सीबीआयसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ दुबईत राहिल्यानंतर भारतात परतणारे भारतीय प्रवासी त्यांच्या कॅरी-ऑन बॅगेजमध्ये १ किलोपर्यंत सोने आणू शकतात. त्यांना त्यावर लागू असलेले सीमाशुल्क भरावे लागते. सोने दागिने, बार किंवा नाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजे आणि भारतीय विमानतळांवर पडताळणीसाठी योग्य कागदपत्रे आवश्यक आहेत. यामध्ये किंमत, शुद्धता आणि तारीख नमूद करणारे खरेदी बिल समाविष्ट आहेत.
भारतीयांना काय आहे मर्यादा?
भारतातील पुरुष प्रवासी, महिला प्रवासी व मुलांसाठी वेगवेगळे नियम आहेत. पुरुष प्रवाशांना दुबईहून ५०,००० पर्यंत किमतीचे २० ग्रॅम सोने शुल्कमुक्त आणता येते. ही सूट नाणी किंवा बारांना लागू आहे परंतु या मर्यादेपेक्षा जास्त सोन्यावर शुल्क आकारले जाते. त्यापुढील २० ग्रॅम ते ५० ग्रॅमसाठी ३% सिमाशुल्क, ५० ग्रॅम ते १०० ग्रॅमसाठी ६% सिमाशुल्क आणि १०० ग्रॅमपेक्षा जास्त सोन्यासाठी १०% सिमाशुल्क लागते.
महिलांना किती आहे मर्यादा?
महिलांना दुबईतून १ लाखापर्यंत किमतीचे ४० ग्रॅम सोने आणण्याची परवानगी आहे. यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे सोने वैयक्तिक वापरासाठी दागिने, बार किंवा नाण्यांच्या स्वरूपात असू शकते. परंतु ४० ग्रॅम ते १०० ग्रॅमपर्यंत ३% सिमाशुल्क, १०० ग्रॅम ते २०० ग्रॅमपर्यंत ६% सिमाशुल्क आणि २०० ग्रॅमपेक्षा जास्त सोन्यासाठी १०% सिमाशुल्क आकारले जाते.
मुलांना सर्वाधिक मर्यादा
१५ वर्षांच्या आतील मुलांना भेटवस्तू किंवा वैयक्तिक वापरासाठी ४० ग्रॅम पर्यंत सोने आणण्याची परवानगी आहे. जर त्यांच्याशी नातेसंबंधाचा योग्य पुरावा आणि बीजक सादर केले असेल तर ही सूट दिला जाते. परंतु ४० ग्रॅम ते १०० ग्रॅम सोन्यासाठी ३% सिमाशुल्क, १०० ग्रॅम ते २०० ग्रॅम सोन्यासाठी ६% सिमाशुल्क आणि २०० ग्रॅमपेक्षा जास्त सोन्यासाठी १०% सिमाशुल्क आकारले जाते.
सीमाशुल्क कसे मोजले जाते?
आयातीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर आधारित सीमाशुल्क मोजले जाते. सीमाशुल्क अधिकारी सोन्याचे मूल्य मोजतात आणि लागू शुल्क टक्केवारी लागू करतात. म्हणून, शुद्धता आणि वजनाचे अचूक पावत्या आणि प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास जप्तीसह दंड होऊ शकतो.
कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या?
पुरुष प्रवासी: २० ग्रॅम पर्यंत शुल्कमुक्त (जास्तीत जास्त ₹५०,०००)
महिला प्रवासी/मुले: ४० ग्रॅम पर्यंत ड्युटी फ्री (जास्तीत जास्त ₹१ लाख)
दुबईमध्ये ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ राहणे: कमी सीमाशुल्कासाठी पात्र
बीजक, शुद्धता प्रमाणपत्र आणि ओळखीचा पुरावा यासारखी योग्य कागदपत्रे आवश्यक आहेत.
भारतीय विमानतळांवर रेड चॅनेलवर अतिरिक्त सोने असल्याचे जाहीर करा












Click it and Unblock the Notifications