Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ब्रिटनच्या निवडणुकीत ऋषी सूनक यांचं हिंदू कार्ड, मंदिरात दर्शनाला

UK General Election 2024 : ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस उरले आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात लंडनच्या प्रतिष्ठित श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. येथे त्यांनी पत्नी अक्षता मूर्तीसोबत प्रार्थना केली.

Pm Rishi Sunak

त्यामुळे ऋषी सुनक निवडणुकीत हिंदू कार्ड वापरू पाहत आहेत का? अशा आशयाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शनिवारी सायंकाळी या दाम्पत्याचा ताफा मंदिर परिसरात पोहोचला. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा करण्यात आली. भव्य मंदिर परिसराला भेट दिली आणि स्वयंसेवक आणि समाजाच्या नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर, सुनक यांनी भारताच्या T20 विश्वचषक विजयाचा संदर्भ देऊन आपल्या भाषणाची सुरुवात केली, आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेबद्दल बोलले.

हो मी हिंदू - ऋषी सूनक

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बोलताना सूनक म्हणाले की, मी हिंदू आहे आणि तुम्हा सर्वांप्रमाणे मलाही माझ्या श्रद्धेतून प्रेरणा आणि सांत्वन मिळते. 'भगवद्गीतेवर' खासदार म्हणून शपथ घेताना मला अभिमान वाटतो. आपला धर्म आपल्याला आपले कर्तव्य पूर्ण करण्यास शिकवतो आणि परिणामांची चिंता करू नये, जर आपण ते प्रामाणिकपणे केले असतील तर.

ऋषी सुनक यांची राजकीय कारकीर्द:

कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. लिझ ट्रसने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाने नवीन नेता निवडला तेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली. ऋषी सुनक यांना पक्षांतर्गत मोठा पाठिंबा मिळाला आणि त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. ऋषी सुनक यांनी 25 ऑक्टोबर 2022 रोजी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.

सुनक यांना निवडणूक जड जाणार?

ब्रिटनच्या संसदेत एकूण 650 जागा आहेत. यापैकी 326 जागा जिंकणार लक्ष सत्तेत येईल. खरतर सध्या सूनक यांच्या काँझर्व्हेटिव पक्षाविरोधात काहीस वातावरण ब्रिटनमध्ये पाहायला मिळत आहे, अश्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे नेमकी निवडणूक कोण जिंकते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+