Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठामपणे मुद्दा मांडण्यासाठी फ्रान्सच्या अध्यक्षांनी दाबला ट्रम्प यांचा हात; व्हिडीओ व्हायरल

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये होते. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मॅक्राँन यांनी ट्रम्प यांचा मुद्दा खोडून काढत, आपले म्हणणे मांडले. या दोघांची हिच मुलाखत सध्या जगभर चर्चेत आली आहे. ट्रम्प यांच्या शेजारी बसून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मांडलेल्या सडेतोड भुमिकेचे सध्या जगभर कौतुक केले जात आहे.

Emmanuel Macron

नेमके काय झाले?

डोनाल्ड ट्रम्प बऱ्याच काळापासून म्हणत आहेत की, युक्रेन युद्धात फक्त वॉशिंग्टनच पैसे खर्च करत आहे. तर युरोपीय देश युक्रेनला आर्थिक मदत देण्याऐवजी कर्ज देत आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्यासमोर ट्रम्पचे दावे खोडून त्यांना गप्प केले. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेते पत्रकारांशी संवाद साधत होते. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युरोपियन देशांकडून कर्ज घेतल्याचा उल्लेख केला. ज्यावर मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांचा हात धरून त्यांना थांबावले. त्यानंतर त्याच्या मुद्याचे जोरदार खंडन केले. मॅक्रॉन म्हणाले की, "स्पष्टपणे सांगायचं तर, आम्ही पैसे दिले आहेत. आम्ही एकूण प्रयत्नांपैकी ६०% पैसे दिले आणि ते अनुदानाद्वारे होते. कर्जाद्वारे नाही. आम्ही खरंच पैसे दिले.

काय म्हणाले मॅक्रॉन?

या संयुक्त पत्रकार परिषदेत मॅक्रॉन म्हणाले की, "या शांततेचा अर्थ युक्रेनचा आत्मसमर्पण असा होऊ नये. याचा अर्थ हमीशिवाय युद्धबंदी असा होऊ नये. मला वाटतं की, या मुद्याचं मूल्यांकन करता येईल. चाचणी करता येईल. ते पुढे म्हणाले, 'माझे अनेक युरोपीय सहकारी यात सामील होण्यास तयार आहेत, परंतु आम्हाला अमेरिकन पाठिंब्याची आवश्यकता आहे, कारण ते सुरक्षा हमीच्या विश्वासार्हतेचा एक भाग आहे आणि ते आमच्या सामूहिक प्रतिबंधक क्षमतेचा देखील एक भाग आहे.'

बैठकीत दिसले मतभेद

या बैठकीत युक्रेनच्या मुद्द्यावर ट्रम्प आणि युरोपीय नेत्यांमधील व्यापक मतभेदांवर प्रकाश टाकण्यात आला. ट्रम्प यांनी युद्धाचा जलद तोडगा हवा असल्याचे संकेत दिले आहेत, तर मॅक्रॉन हे युक्रेनच्या सार्वभौमत्वाच्या किंमतीवर कोणताही शांतता करार होऊ नये यावर ठाम आहेत. त्यांनी वारंवार यावर भर दिला की कोणत्याही शांतता करारात सुरक्षा हमी असणे आवश्यक आहे, ज्याची चाचणी आणि पडताळणी करणे आवश्यक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+