मोठी बातमी: नेपाळमध्ये भुकंप; भारतातील 'या' शहरातही जाणवले धक्के, किती होती तीव्रता? वाचा
भुकंपांच्या धक्क्यांनी सध्या जगातील अनेक देश हैराण झाले असतानाच भुकंपाची अजून एक बातमी समोर आली आहे. यावेळी नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भुकंपाची तिव्रता ५.० रिश्टर स्केलपर्यंत मोजण्यात आली. या भुकंपाचे धक्के नेपाळसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये जाणवले. दिल्लीसह उत्तर भारतातील काही शहरांतदेखील या भुकंपाचे धक्के जाणवले.

नेपाळमध्ये भुकंपाचे धक्के
आज नेपाळमध्ये ५.० रिश्टर स्केलचा भुकंप झाला. भूकंपाचे केंद्र नेपाळ होते. भूकंप होताच नेपाळ आणि आसपासच्या परिसरात घबराट पसरली. हा भूकंप तीव्र होता. अद्याप जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. हा भूकंप सुमारे २० किलोमीटर खोलीवर होता.
EQ of M: 5.0, On: 04/04/2025 19:52:53 IST, Lat: 28.83 N, Long: 82.06 E, Depth: 20 Km, Location: Nepal.
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 4, 2025
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjcVGs @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/DxUFnxRvc7
भारतातही जाणवले धक्के
शुक्रवारी झालेल्या भूकंपाचे केंद्र नेपाळ असले तरी, त्याचे धक्के बिहार, उत्तर प्रदेशपासून दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार देखील भूकंपाने हादरले. तथापि, हे भूकंप खूपच सौम्य होते, ज्यामुळे ते फारसे लोकांना जाणवले नाहीत. अलिकडच्या काळात भूकंपाचे धक्के सतत जाणवत आहेत. २८ मार्च रोजी म्यानमार-थायलंडमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले. म्यानमारमध्ये झालेल्या या भूकंपात ३००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.












Click it and Unblock the Notifications